AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुंबईत भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत, फिल्मी स्टाईलने गुंगीचे औषध लावून तीन महिन्याच्या बाळाची चोरी

मुंबईत (Mumbai) भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत सध्या पाहायला मिळत आहे. जुना मोबाईलच्या बदल्यात नवी भांडी विकण्यासाठी आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची (Woman Thief) घटना काळा चौकी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

Video | मुंबईत भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत, फिल्मी स्टाईलने गुंगीचे औषध लावून तीन महिन्याच्या बाळाची चोरी
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 6:23 PM
Share

मुंबई : मुंबईत (Mumbai) भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत सध्या पाहायला मिळत आहे. जुना मोबाईलच्या बदल्यात नवी भांडी विकण्यासाठी आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची (Woman Thief) घटना काळा चौकी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

आईचा नाकाला गुंगीचं औषध लावून बाळ घेऊन पसार

मंगळवारी 30 नोव्हेंबरला सपना बजरंग मगदूम (वय – 36) या त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीसोबत घरात होत्या. यावेळी एक 30-35 वर्षांची अनोळखी महिला त्यांच्या घरी आली. ती जुन्या मोबाईलच्या बदल्यात कपडे ठेवण्याची बास्केट विकण्यासाठी आल्याचं तिने महिलेला सांगितलं.

महिलेला ती बास्केट घ्यायची होती. त्यामुळे ती जुने मोबाईल घेण्यासाठी आतील खोलीत गेली. तेव्हा या महिलेने मागून येत अगदी फिल्मी स्टाईलने महिलेच्या नाकाला गुंगीचं औषध लावलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली. तेव्हा आरोपी महिलेने पलंगावरील 3 महिने 15 दिवसांच्या मुलीचे अपहरण केले.

पाहा व्हिडीओ :

अपहरण झालेल्या बाळाचं नाव वेदा बजरंग मगदूम आहे. आपलं बाळ चोरुन नेलं, या घटनेने कासावीस झालेल्या महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात कलम 328, 363, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

‘वडील जिवंत असेपर्यंत हिस्सा मागण्याचा कोणताही अधिकार नाही!’, गायिकेला वडिलांचे घर सोडण्याचा आदेश!

CCTV | आधी कारची काच फोडली, मग चोरटा अख्खा आत घुसला, उल्हासनगरात पाच लाखांची धाडसी चोरी

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...