CCTV | आधी कारची काच फोडली, मग चोरटा अख्खा आत घुसला, उल्हासनगरात पाच लाखांची धाडसी चोरी

एका चोरट्याने गाडीत घुसून 5 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग काढली आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पोबारा केला. आपल्या गाडीची काच फुटली असल्याची बाब काही वेळानं राजनारायण यादव यांच्या लक्षात आली.

CCTV | आधी कारची काच फोडली, मग चोरटा अख्खा आत घुसला, उल्हासनगरात पाच लाखांची धाडसी चोरी
उल्हासनगरमधील गाडीतील चोरी सीसीटीव्हीत कैद

उल्हानगर : रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची काच फोडून गाडीतली पाच लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरामध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागातील शांतीनगर परिसरात राजनारायण यादव यांचं स्लायडिंगचं दुकान आहे. राजनारायण यादव यांनी शुक्रवारी दुपारी त्यांच्या दुकानासमोर त्यांची गाडी उभी केली होती. या गाडीत यादव यांची 5 लाख रुपये रक्कम असलेली एक बॅग देखील ठेवली होती.

गाडीची समोरच्या खिडकीची काच फोडली

यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गाडीत असलेली ही बॅग हेरली. यानंतर यापैकी एका चोरट्याने गाडीची समोरच्या खिडकीची काच फोडली, तर दुसरा चोरटा दुचाकी चालू ठेवून पळण्याच्या तयारीत बाजूला उभा राहिला.

5 लाख रुपये असलेली बॅग लंपास

यानंतर एका चोरट्याने गाडीत घुसून 5 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग काढली आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पोबारा केला. आपल्या गाडीची काच फुटली असल्याची बाब काही वेळानं राजनारायण यादव यांच्या लक्षात आली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध

त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता या दोन चोरट्यांनी केलेली ही चोरी उघड झाली. या चोरी प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

खुर्चीला हात-पाय बांधून नातवानेच गळा चिरला, नागपुरातील महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं

19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात

गरोदर असल्याचं सांगून लग्नाचा तगादा, पण प्रेयसीला गर्भाशयच नव्हतं, प्रियकराने काटा काढला

Published On - 2:13 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI