Kurla Rape Murder | गरोदर असल्याचं सांगून लग्नाचा तगादा, पण प्रेयसीला गर्भाशयच नव्हतं, प्रियकराने काटा काढला

गेल्या काही महिन्यांपासून तरुणी रेयानला आपण गरोदर असल्याचे सांगत होती, आणि त्याने तिच्याशी लग्न करावे, अशी गळ घालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्या पालकांना या गर्भधारणेबद्दल कळले तर काय होईल, या विचारांनी चिडलेल्या आणि घाबरलेल्या रेयानने त्याच्या मित्रांकडे सल्ला मागितला

Kurla Rape Murder | गरोदर असल्याचं सांगून लग्नाचा तगादा, पण प्रेयसीला गर्भाशयच नव्हतं, प्रियकराने काटा काढला
क्राईम

मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरातील 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. गर्भवती असल्याचे सांगून प्रियकराला ब्लॅकमेल करणाऱ्या गोवंडीतील तरुणीला गर्भाशयच नसल्यामुळे तिला गर्भधारणा होणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. विनोबा भावे नगर पोलिसांनी तिचा प्रियकर रेयान शेख आणि त्याचा मित्र फैसल शेख या दोघांनाही अटक केली होती. तपासात आता तिसऱ्या आरोपीचा सहभाग उघड झाला आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कंपाऊंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता.

कशी झाली ओळख?

मृत तरुणी आरोपी रेयानच्या घराजवळच राहत होती. 23 नोव्हेंबर रोजी मावशीच्या घरी जात असल्याचे सांगून त्याच्यासोबत घरातून निघून गेली होती. “तरुणीची आई रेयानकडे घरकाम करायची. तेव्हाच पीडिता आणि रेयान या दोघांची मैत्री झाली. ते एक-दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. ते गुपचूप भेटत असत आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या अफेअरबद्दल काहीच माहिती नव्हती” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गर्भवती असल्याचं सांगत लग्नाचा तगादा

गेल्या काही महिन्यांपासून तरुणी रेयानला आपण गरोदर असल्याचे सांगत होती, आणि त्याने तिच्याशी लग्न करावे, अशी गळ घालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्या पालकांना या गर्भधारणेबद्दल कळले तर काय होईल, या विचारांनी चिडलेल्या आणि घाबरलेल्या रेयानने त्याच्या मित्रांकडे सल्ला मागितला. तिला धमकावण्याची आणि न ऐकल्यास जीवे ठार मारण्याचा सल्ला मित्रांनी दिला.

काय होता प्लॅन?

रेयानने त्याच्या मित्राकडून (ज्याला अजून अटक व्हायची आहे) एक सिमकार्ड घेतले, तिला फोन करुन कुर्ल्याला सोबत येण्यास सांगितले. तिथे गेल्यावर तो तिला रिक्षाने एचडीआयएल कंपाउंडमध्ये घेऊन गेला. तिथे रेयानचा मित्र फैसलही थांबला आहे, याची तरुणीला कल्पना नव्हती. रेयान तिला 13 व्या मजल्यावरच्या टेरेसवर घेऊन गेला, नंतर लिफ्ट रुममध्ये गेला, तिथे त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिची मान कापली, असंही पोलिसांनी सांगितलं.

तरुणीच्या डोक्यावर हातोड्याने वार

त्यानंतर लपून बसलेला फैसल बाहेर आला आणि त्याने तरुणीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, पोलिसांनी सांगितले की, तिच्या शरीरावर जखमांच्या 26 खुणा होत्या. तरुणीची हत्या केल्यानंतर, त्यांनी सिमकार्ड त्यांच्या मित्राला परत केले आणि तिघांनी एक आठवडा लपून राहण्याचा निर्णय घेतला.

बारावी उत्तीर्ण झालेला रेयान त्याच्या वाईट स्वभावामुळे याआधीही पोलिसांसमोर अडचणीत आला होता. दोन महिन्यांपूर्वी गोवंडी रेल्वे स्थानकावर त्याचे कोणाशी तरी भांडण झाले आणि गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल काढून घेतला होता, पण तो आपली प्रेयसी आणि मित्रांशी बोलण्यासाठी त्याच्या आईचा किंवा मित्रांचा फोन वापरत होता.


संबंधित बातम्या :

प्रियकराचा नवऱ्यावर हल्ला, बचावासाठी मध्ये पडलेली विवाहित प्रेयसी मृत्युमुखी, कोर्टाचा मोठा निकाल

मी भारतीय सैन्यात आहे, लग्न करशील का? पुण्यातील तरुणीवर बलात्कार करुन भामटा परागंदा

सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह शवागारात कुजत, रुग्णालयाने दोन कुटुंबांच्या दुःखावरची खपली काढली

Published On - 10:15 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI