19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात

तरुणीचा प्रियकर नयन शहारे (वय 19 वर्ष) हा लग्नाची मागणी घालायला शिल्पाच्या घरी आला होता. मात्र शिल्पाच्या घरच्या व्यक्तींनी लग्नाला नकार दिला. याचा राग मनात धरुन प्रियकरानेच शिल्पाच्या हाताची नस कापून खून केला.

19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात
भंडाऱ्यात तरुणीची हत्या

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवतीचा मृतदेह कब्रस्थान परिसरात आढळल्याने भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तिच्या मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली सापडल्याने युवतीची हत्या झाली, की तिने आत्महत्या केली, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्रेयसीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्यामुळे तिची प्रियकराने हत्या केल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदुरमध्ये हा प्रकार घडला. 19 वर्षीय मयत युवतीचे नाव शिल्पा तेजराम फुल्लूके असे आहे. ती संताजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्याशी लग्न करायला पाहण्यासाठी एक युवक येणार होता. त्यामुळे सामान खरेदीच्या बहाण्याने सकाळी 11 वाजता ती घरातून बाहेर निघाली.

मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला सुरा आणि विषाची बाटली

शिल्पाचा मृतदेह पालांदुर अड्याळ रस्तावरील कब्रस्थानाच्या जवळ एका निर्जन स्थळी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. तिच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला सुरा आणि विषाची बाटली सापडल्याने मृत्यूचे गूढ वाढले होते. पालांदुर पोलिसांनी घटनेचा उलट सुलट तपास केला.

प्रेयसीच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याचा राग

तरुणीचा प्रियकर नयन शहारे (वय 19 वर्ष) हा लग्नाची मागणी घालायला शिल्पाच्या घरी आला होता. मात्र शिल्पाच्या घरच्या व्यक्तींनी लग्नाला नकार दिला. याचा राग मनात धरुन प्रियकरानेच शिल्पाच्या हाताची नस कापून खून केला. याची कबुली आरोपीने दिली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


संबंधित बातम्या :

प्रियकराचा नवऱ्यावर हल्ला, बचावासाठी मध्ये पडलेली विवाहित प्रेयसी मृत्युमुखी, कोर्टाचा मोठा निकाल

मी भारतीय सैन्यात आहे, लग्न करशील का? पुण्यातील तरुणीवर बलात्कार करुन भामटा परागंदा

Kurla Rape Murder | गरोदर असल्याचं सांगून लग्नाचा तगादा, पण प्रेयसीला गर्भाशयच नव्हतं, प्रियकराने काटा काढला

Published On - 10:55 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI