AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! हा बडा नेता शिंदे सेनेच्या वाटेवर

Sunil Tatkare NCP Raigad: एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्याचवेळी सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. हा बडा नेता शिंदे सेनेच्या वाटेवर आहे.

सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! हा बडा नेता शिंदे सेनेच्या वाटेवर
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का! हा बडा नेता शिंदे सेनेच्या वाटेवर
| Updated on: Nov 13, 2026 | 11:28 AM
Share

Sunil Tatkare NCP Raigad: राज्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी राजकारण तापलेले असताना पुण्यासह मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना सकाळीच फोन गेले. तर खासदार पार्थ पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या दौऱ्यात मोठा बदल झाला आहे. तर त्याचवेळी त्यांच्या होम गाऊंडवरही मोठी घडामोड घडली आहे. सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. हा बडा नेता शिंदे सेनेच्या वाटेवर आहे.

दर्शन विचारे यांची पक्षाला सोडचिठ्ठी

मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून श्रीवर्धनमध्ये शिंदे सेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यातच दर्शन विचारे यांनी तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत कलगीतूरा

महायुतीची सत्ता आल्यापासून रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे शिवसेनेत कलगीतूरा दिसून आला आहे. अगोदर पालकमंत्री पदावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला. भरतशेठ गोगावले विरुद्ध सुनील तटकरे असा सामना रंगला. दोघांमध्ये दिलजमाईचे अनेक प्रयत्न पक्ष श्रेष्ठींनी केले. यावर्षी पालकमंत्री पदाचा तिढा सुटला. मध्यंतरी सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी दोन्ही पक्षाने एकमेकांना सहकार्य केले. पण एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी नेते सोडत नाहीत.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी मोठे आरोप केले. त्यानंतर वातावरण तापले. सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ही तलवार उपसली. त्यांनीही तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. तर पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनीही राष्ट्रवादीविरोधात सूर आळवला. हा वाद सुरू असतानाच आता शिंदे सेनेने राष्ट्रवादीला हादरा देण्याचा प्रयत्न केला आहे.

भरतशेठ गोगावले आरोपावर काय म्हणाले?

ज्यावेळेला मागच्या निवडणुकीला पहिला डिक्लेरेशन तिकीट होण्याच्या अगोदर रामदास कदम यांनी तटकरे यांचे नाव डिक्लेअर केला होता त्यावेळेस त्यांनी त्यांना जवळून पाहिला असेल रामदास कदम यांना आम्ही विचारू की तुम्हीच त्यांचे पहिला तिकीट डिक्लेअर केले आहे. पण ते सीनियर असल्यामुळे आम्हाला काही बंधन आहेत आम्ही जास्त खोलात जात नाही पण आम्हाला वाटते वरच्या पातळीवरती यांची चर्चा चालू आहे काही ना काही मार्ग नाही निघेल. प्रामाणिकपणा जपण्याचा आम्ही काम करतोय आम्ही एकच सांगतो काही गोष्टी आलेला कार्य होतात. परंतु शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं आहे ते आम्ही मान्य करतो आणि आम्ही त्याप्रमाणे चालतो. आम्हाला युतीचा धर्म टिकवायचा आहे हा सर्वांनी टिकवायला पाहिजे. आमचा तत्वाचा वाद आहे त्यावर आमचे दोन मंडळी बोलतात ते आम्ही आज नव्हते संपवून टाकू, असे पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले.

अजित पवार यांच्या अपघाताविषयी मोठे वक्तव्य

बोलणारच तोंड धरू शकत नाही मारणार याची काठी धरू शकतो कुणीतरी काही बोलत राहिला जो पर्यंत वस्तुस्थिती बाहेर येत नाही तोपर्यंत आम्हाला काही बोलता येत नाही. जो पायलेट आहे त्याचा देखील स्वतःचा जीव प्यारा आहे तो दुसऱ्यासाठी आपला जीव अर्पण करेल का? या मधले काही लोकांची नावं येतात चर्चा होतात आदल्या दिवशी त्यांची बैठक झाली चर्चा झाली, असे गोगावले म्हणाले.

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येणार?

मंत्री गुलाबराव पाटील गुलाबासारखे आहेत त्यांनी जे काही सांगितलं ते सांगितलं आता जे काही भवितव्य आणि भविष्यात दिसत आहे त्यावरून आम्हाला काही वाटत नाही पण राजकारणात कधी काही घडू शकत सकाळच्या दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे आहे. राजकारणात काही घडेल सांगू शकत नाही गुलाबरावना तशी काय भनक लागली असेल ते देखील आम्ही मंगळवारी कॅबिनेट मिटींगला विचारतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली.

Follow Us
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला