
नणदेच्या नवऱ्याकडे नेहमी सन्मानाने पाहिलं जातं. त्याला भावोजी म्हणतात. बायकोचा भाऊ म्हणजे मेव्हणा. मेव्हणा आणि भावोजीच नातं खट्याळपणा, मैत्रीच असतं. पण एका भावोजीने या नात्याला कलंक लावला. तो मेव्हण्याचीच बायको घेऊन पळाला. मेव्हण्याने एका विधवेसोबत लग्न केलेलं. पण भावोजी तिला घेऊन पळून गेला. भावोजी आणि पत्नीला जो शोधून आणेल, त्याला 10 हजार रुपये इनाम देण्याची घोषणा मेव्हण्याने केली आहे. ‘जो कोणी यांना शोधून आणले, किंवा पत्ता सांगेल त्याला माझ्याकडून 10 हजार रुपये इनाम’ असं मेव्हण्याने जाहीर केलं आहे.
महिलेच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. उत्तर प्रदेश इटावा सैफईमधील हे प्रकरण आहे. महिलेच्या पतीने सांगितलं की, “मी एकाहाताने दिव्यांग आहे. मी एका विधवा महिलेसोबत लग्न केलं होतं. माझा भावोजी 60 वर्षांचा आहे. माझ्या घरात त्याचं येणं-जाणं होतं” “आठवडाभर आधी त्याने माझ्या घरी प्लास्टर केलं होतं. त्यावेळी माझ्या पत्नीसोबत त्याने बोलणं वाढवलेलं. संधी मिळताच तो माझ्या पत्नीला घेऊन फरार झाला” असं मेव्हण्याने सांगितलं.
दोघांना लाज वाटली नाही
“पळून गेलेले दोघेही विवाहित आहेत. मुलं-बाळं आहेत. पण दोघांना लाज वाटली नाही. पत्नी माझ्या घरातून कॅश आणि दागिने घेऊन गेली. मी त्या दोघांना शोधतच आहे. पण अजून कोणी त्यांचा पत्ता सांगितला, 10 हजार रुपये बक्षीस म्हणून देईन” असं मेव्हण्याने सांगितलं. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. लवकरच दोघांना अटक होईल. आता या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे.