AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS कोणाच्या विरोधात नाही, आमचे काम संपूर्ण देशासाठी – मोहन भागवत

'संघ कोणाच्याही विरोधात नाही, तर राष्ट्रासाठी काम करतो. संघाचे कार्य अद्वितीय आहे, जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे,' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षे - नवे क्षितीज या कार्यक्रमात बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले.

RSS कोणाच्या विरोधात नाही, आमचे काम संपूर्ण देशासाठी - मोहन भागवत
Mohan Bhagwat
| Updated on: Feb 07, 2026 | 8:07 PM
Share

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षा निमित्त नवे क्षितीज कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे भाषण झाले. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की आरएसएस कोणाच्या विरोधात नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या स्थापनेचा उल्लेख केला. संघ प्रमुख म्हणाले की इंग्रजांनी काँग्रेसची स्थापना सुरक्षा वॉल्वच्या रुपात केली होती. भारतीयांनी यास स्वातंत्र्य संग्रामाच्या एका शक्तीशाली साधनात बदलले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि चित्रपट हस्तीदेखील सामील होत्या.

या कार्यक्रमात ७००-८०० लोक सामील होणार

संघाचे काम अनोखे आहे आमच्या माहितीनुसार आम्ही म्हणतो की असे काम जगात कुठेही होत नाही. आता आम्ही याचा थेट अनुभव घेत आहोत कारण भारत आणि परदेशातून लोक संघाला पाहण्यासाठी येतात. पाच महाखंडातून लोक येतात, संघाच्या कार्यक्रम आणि कामाचा अभ्यास करत असतात अनेक प्रश्न विचारत असतात असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो, मग आफ्रीका, युरोप, अमेरिका, द.पूर्व आशिया वा मध्य पूर्वेतील लोक असोत. ते विचारतात की ही पद्धती तरुणपिढी साठी प्रासंगिक आहे आणि त्यांच्या स्वत:च्या देशाच्या इतिहासात कदाचित गौतम बुद्धानंतर असा अखिल भारतीय प्रयत्न झालेला नाही.

अनेक लोक संघाची तुलना इतर संघटनांशी करतात

“अनेक लोक संघाची तुलना इतर चालू उपक्रमांशी, संस्थांशी, संघटनांशी किंवा पक्षांशी करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ते संघाकडे वरवर आणि दूरून पाहतात तेव्हा गैरसमज निर्माण होतात. ते लोक जेव्हा आमचे कार्यक्रम पाहतात, आमचे मोर्चे आणि उपक्रम पाहतात, परंतू संघ ही निमलष्करी संघटना नाही. संघाचे स्वयंसेवक काठ्या चालवायला शिकतात, परंतू संघ हा देशव्यापी कुस्तीचा आखाडा नाही असेही संघप्रमुख भागवत यावेळी म्हणाले.

संघाचे कार्य स्वतःसाठी नाही तर संपूर्ण राष्ट्रासाठी

संघ भारतीय परंपरेवर आधारित संगीत वाजवतो आणि वैयक्तिक गाणी देखील गातो. पुन्हा एकदा, शंभर वर्षांनंतर, आम्ही तुम्हाला संघ काय आहे ते सांगत आहोत.संघाचे कार्य स्वतःसाठी नाही तर संपूर्ण राष्ट्रासाठी आहे असेही या व्याख्यानात मोहन भागवत यांनी सांगितले.

संघ कोणाशीही स्पर्धेत करत नाही

संघाची स्थापना कोणाशीही स्पर्धा करण्यासाठी झाली नाही. संघाची स्थापना इतर कोणत्याही संघटनेशी स्पर्धेत झाली नाही, किंवा तो कोणत्याही विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेला नाही आणि संघ कोणाच्याही विरोधात वागला नाही. आमचे काम कोणाचाही विरोध न करता केले जाते. संघाला लोकप्रियता वा सत्ता हवी आहे असे संघ प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले.

कार्यक्रमाला कोण कोण होते ?

उद्योगपती

राधाकृष्ण दमानी

अजय पीरामल

दीपक पारेख

सज्जन जिंदाल

नीलेश शाह

आशीष कुमार चौहान

सिनेमा जगतातील हस्ती

सलमान खान

हेमा मालिनी

रोनी स्क्रूवाला

विनीत जैन

सुभाष चंद्रा

नितेश तिवारी

मोहित सूरी

रमेश टूरानी

बोनी कपूर

अदनान सामी

ओम राऊत

विपुल शाह

प्रसाद ओक

इंद्र कुमार

अन्य हस्ती –

स्वामी स्वरूपानंद

अक्षत गुप्ता

इस्राईलचे राजकीय नेते

ब्रिटनचे राजकीय नेते

इटलीचे राजकीय नेते

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?