AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार-शरद पवार यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ समोर; पवार कुटुंबात चाललंय काय?

पार्थ पवार, शरद पवार यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ पवार शरद पवार यांना काहीतरी सांगत असल्याचे दिसत आहे.

पार्थ पवार-शरद पवार यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ समोर; पवार कुटुंबात चाललंय काय?
parth pawar and sharad pawar and rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 8:10 PM
Share

Parth Pawar And Sharad Pawar : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे ही अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत. राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनही सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे सर्व अधिकार सोपवले आहेत. अजितदादांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याची, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते या विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे म्हटले जात असले तरी पवार कुटुंबातील बडे चेहरे एकमेकांना भेडत आहेत. आता नुकतेच अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार, खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार यांची भेट झाली आहे. पार्थ पवार, शरद पवार आणि रोहित पवार यांच्या अशाच एका भेटीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार यांची देहबोली बरंच काही सांगू जात आहे, असे म्हटले जात असून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भविष्यात काही घडणार का? असे विचारले जात आहे.

पार्थ पवार, शरद पवार यांचा व्हिडीओ समोर

अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार हे पवार कुटुंबात मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. शरद पवार आता तिसऱ्या पिढीला मार्गदर्शन करत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अगोदर पार्थ पवार हे शरद पवार यांना काहीतरी सांगत असल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांचे ऐकत असताना शरद पवार हे नकारार्थी मान हलवत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांनी डावा हात वर करत नाही असे सांगितले आहे. तरीदेखील पार्थ पवार त्यांचे बोलणे सुरूच ठेवत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार हे नकारार्थी मान हलवत असल्याचे दिसत आहे. पुढे शरद पवार यांनी पार्थ पवार यांना प्रश्न विचारल्याचे आणि पार्थ पवार यांनी त्याला उत्तर दिल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ पवार शरद पवार यांना काहीतरी सांगत आहेत आणि शरद पवार नकार देत असल्याचे दिसत आहे. हाच व्हिडीओ पाहून शरद पवार यांना पार्थ पवार यांच्याविषयी जिव्हाळा असल्याचेही म्हटले जात आहे.

शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत

पवार कुटुंबातील असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये शरद पवार हे पार्थ पवार आणि रोहित पवार यांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसत आहे. रोहित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांचे काळजीपूर्वक ऐकत असल्याचे हा फोटो पाहून म्हटले जात आहे. दरम्यान सध्या समोर आलेले हे फोटो आणि व्हिडीओ पाहून शरद पवार हे कुटुंबात मार्गदर्शकाच्या भूमिकेत असून भविष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार का? असे विचारले जात आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?