60 वर्षाची गर्लफ्रेंड 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडकडे एकच मागणी करत होती, अखेर एकदिवस तो सर्व मर्यादा विसरला, आणि…
इमरानच सासर पश्चिम बंगालमध्ये जोशीनाच्या घराजवळ होतं. त्यामुळे इमरान आणि जोशीनाच्या भेटीगाठी वाढल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

एका व्यक्तीने आपल्या 60 वर्षाच्या गर्लफ्रेंडची हत्या केली. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. हे प्रकरण 14 नोव्हेंबरच आहे. रस्त्याच्या कडेला एक अज्ज्ञात महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृतदेहाची ओळख आणि आरोपीला पकडण्यासाठी 10 टीम्स बनवण्यात आलेल्या. जोशीना (60) अशी मृत महिलेची ओळख पटली. पोलिसांनी पाच जिल्ह्यातील एक हजार सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर इमरान (45) नावाच्या व्यक्तीवर संशय आला. आरोपीला उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील हतीसा पुलाजवळ अटक झाली.
इमरानने कोलकाता येथे राहणाऱ्या जोशीनाची मुलगी मुमताजच लग्न आगऱ्याचा निवासी सत्तार सोबत ठरवलेलं. इमरानच सासर पश्चिम बंगालमध्ये जोशीनाच्या घराजवळ होतं. त्यामुळे आरोपी इमरान आणि जोशीनाच्या भेटीगाठी वाढल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सत्तार आणि मुमताजच 10 नोव्हेंबरला लग्न होतं. त्यासाठी जोशीना कोलकातावरुन आलेली.
चौकशीत काय सांगितलं?
जोशीना इमरानच्या घरी जाऊन त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. इमरानला पत्नी आणि मुलं आहेत. त्यामुळे त्याला दुसरं लग्न करायचं नव्हतं. पोलीस अधीक्षकांनुसार, इमरानने पोलीस चौकशीत सांगितलं की, त्याने 13 नोव्हेंबरला जोशीनाला कोलकात्याला घेऊन जाण्याच्या बहाण्याने आगरा येथून बस पकडली. पण पश्चिम बंगालला जाणारी बस पकडण्याऐवजी आगऱ्याला जाण्यासाठी सोहराब गेट डेपोची बस पकडली. रस्त्यात दोघे हाथरसच्या नगला भुस येथे उतरले.
पुढील कारवाई सुरु आहे
तिथे एका निर्जन स्थळी जोशीनापासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी त्याने गळा आवळून तिची हत्या केली. नंतर तिथून पळून गेला. आता आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे. त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरु आहे.
