विवाहित महिलेने रात्री उशिरा युवकाला घरी बोलवून त्याच्या प्रायवेट पार्टवर केला चाकू हल्ला, कारण काय?

युवकाच्या प्रायवेट पार्टवर हल्ला करणाऱ्या महिलेला दोन मुलं आहेत. तिचा नवरा अहमदाबादला नोकरी करतो. महिलेने युवकाला बोलवून त्याच्या प्रायवेट पार्टवर चाकू हल्ला का केला? त्यामागे काय कारण आहे?

विवाहित महिलेने रात्री उशिरा युवकाला घरी बोलवून त्याच्या प्रायवेट पार्टवर केला चाकू हल्ला, कारण काय?
Operation
| Updated on: Oct 08, 2025 | 4:26 PM

एका विवाहित महिलेने गावातील युवकाला घरी बोलावलं व त्याच्या प्रायवेट पार्टवर चाकू हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या या युवकाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांची गंभीर हालत बघून डॉक्टरांनी त्याला चांगल्या उपचारासाठी वाराणसीला रेफर केलं. आरोपी महिलेला ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील हे प्रकरण आहे.

हे प्रकरण सरपतहां पोलीस ठाणे क्षेत्रातील डकहा गावातील आहे. याच गावात राहणाऱ्या दोन मुलांच्या आईने मंगळवारी रात्री उशिरा गावात राहणाऱ्या 22 वर्षीय युवकाला आपल्या घरी बोलावलं. महिलेने युवकाच्या प्रायवेट पार्टवर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. युवक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळून तडफडत होता. युवकाने आरडाओरडा केल्यानंतर आसपासच्या लोकांना कळलं. त्यानंतर युवकाच्या नातेवाईकांना समजलं. नातेवाईकांनी पोलिसांना कळवून त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तिथून त्याला वाराणसीला रेफर करण्यात आलं.

हल्ला का केला?

युवकाच्या प्रायवेट पार्टवर हल्ला करणाऱ्या महिलेला दोन मुलं आहेत. तिचा नवरा अहमदाबादला नोकरी करतो. महिलेने युवकाला बोलवून त्याच्या प्रायवेट पार्टवर चाकू हल्ला का केला? त्यामागे काय कारण आहे? सध्या आरोपी महिला या बद्दल काही बोललेली नाही. अनैतिक संबंधांच्या नाराजीतून अशी घटना घडल्याची शक्यता आहे. युवकाची हालत गंभीर असून वाराणसीच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

महिलेला ताब्यात घेऊन आवश्यक कारवाई सुरु

घटनेनंतर शाहगंजचे डीएसपी अजीत सिंह चौहान यांनी सांगितलं की,”डकहा गावातील एका महिलेने गावातील एका युवकाला मंगळवारी रात्री उशिरा बोलावलं व त्याच्या प्रायवेट पार्टवर चाकू हल्ला केला. युवकाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्याची गंभीर हालत बघून त्याला वाराणसीला रेफर केलं. सध्या महिलेला ताब्यात घेऊन आवश्यक कारवाई सुरु आहे”