
कोर्टात एका स्टेनोच मृत्यू झालाय. एका शिपायाचा या प्रकरणाशी संबंध जोडला जातोय. नेहा संखवारच्या आईच्या चौकशीनंतरच तिच्या जीवन संपवण्याचं रहस्य समजू शकतं. नेहा कोर्टात स्टेनोच्या पदावर कार्यरत होती. जीवन संपवण्याचं टोकाच पाऊल उचलण्याआधी 41 मिनिटात नेहा बरोबर 8 वेळा आपल्या आईशी बोलली होती. त्यामुळे आईच्या चौकशीनंतर मृत्यूच खरं कारण समोर येऊ शकतं. इतक्या कमी वेळात नेहा आपल्या आईशी इतक्यांदा बोलली असेल तर ती नक्कीच त्रस्त असेल. तिने तिच्या आईला सर्वकाही सांगितलं असेल. उत्तर प्रदेशच्या कानपूर कोर्टात नेहा स्टेनो म्हणून काम करायची.
नेहा संखवार कानपूरच्या घाटमपुर कोटरा मकरंदपुर येथे रहायला होती. सिविल जज सीनियर डिवीजन कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून ती काम करायची. 18 ऑक्टोंबरच्या दुपारी तिने कोर्टाच्या सहाव्या मजल्यावर उडी मारुन आपलं जीवन संपवलं. या घटनेने कोर्टाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. तिथे उपस्थित पोलीस लगेच नेहाला घेऊन रुग्णालयात गेले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.
नेहाच्या वडिलांनी मृत्यूसाठी शिपायाला का जबाबदार धरलं?
नेहाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, तिला चार महिन्यापूर्वी नोकरी मिळाली होती. त्यांच्या मते नेहा खूप त्रस्त असायची. नेहाचे वडिल गोविंद प्रसाद यांना माहिती मिळताच ते तात्काळ कानपूरला पोहोचले. त्यांनी नेहाच्या मृत्यूसाठी कोर्टातील प्रेझेंटर आणि शिपायाला जबाबदार ठरलं. प्रेझेंटर आणि शिपाई आपल्या मुलीला त्रास द्यायचे. त्याचा उल्लेख नेहाने आपल्या घरी सुद्धा केला होता. तिच्या पाण्यात काहीतरी मिसळलं जातं, त्यामुळे तिला चक्कर येतात असं सुद्धा नेहाने तिच्या वडिलांना सांगितलेलं.
या सगळ्याचा खुलासा आईच्या चौकशीनंतरच होईल
आता या प्रकरणात पोलीस नेहाची आई आणि प्रेझेंटरची चौकशी करणार आहेत. नेहाच्या आईची चौकशी यासाठी होणार आहे की, नेहाने जवळपास 2 वाजता आत्महत्या केली. त्याआधी दुपारी 1 ते 2 दरम्यान नेहा तिच्या आईसोबत 41 मिनिटात 8 वेळा बोलली. आता पोलिसांना हे जाणून घ्यायचं आहे की, नेहाने इतकावेळ तिच्या आईशी बोलून तिला काय सांगितलं. नेहाने तिच्या अडचणीबद्दल काही सांगितलं होतं का?. नेहाने कोणाचं नाव घेतलेलं का? या सगळ्याचा खुलासा आईच्या चौकशीनंतरच होईल.