
एका विवाहित युवकाने किन्नरांवर जबरदस्तीने जेंडर बदलण्याचा आरोप केला आहे. त्याने सांगितलं की, मला कोल्ड ड्रिंक पाजून बेशुद्ध केलं. मग, माझा प्रायवेट पार्टच कापून टाकला. मी 5 दिवस बेशुद्ध होतो. शुद्ध आली, तेव्हा मी रुग्णालयात होतो. माझा प्रायवेट पार्ट कापलेला. माझ लिंग बदलण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील ही घटना आहे. युवकानुसार, तो डान्स प्रोग्रॅमसाठी बदायूंला चाललेला. वाटेत लवीना किन्नर आणि त्याचा मित्र विकास युवकाला भेटले. लवीना त्याला आपल्या घरी घेऊन गेली. तिथे त्याला कोल्ड ड्रिंक पाजलं. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. युवकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची हालत गंभीर आहे. पीडित पत्नीने आरोपींविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
पत्नीने सांगितलं की, तिचा पती हास्य आणि डान्स कलाकार आहे. लवीनासोबत पार्ट्यांमध्ये काम करतो. लवीना आणि विकास नावाचा व्यक्ती माझ्या नवऱ्याला फसवून लवीनच्या घरी घेऊन गेले. तिथे लवीनाने माझ्या पतीला नशेचा पदार्थ मिसळून पेय प्यायला दिलं. बेशुद्ध असताना लवीना आणि विकासने माझ्या पतीच जबरदस्तीने लिंग चेंज केलं.
अल्ट्रासाऊंडसह काही रिपोर्ट मागितले
पत्नीने सांगितलं की, पतीला पाच दिवसांनी शुद्ध आली. त्याने फोन करुन सगळी घटना सांगितली. डॉक्टरांनी सांगितलं की, युवकाच्या जेंडर चेंजच प्रकरण आलय. काही रिपोर्ट्स मागितले आहेत. जेंडर चेंजच प्रकरण समोर आलय, असं डॉ. आरके चंदेल म्हणाले. अल्ट्रासाऊंडसह काही रिपोर्ट मागितलेत. हा चौकशीचा विषय आहे.
पोलिसांनी काय केलं?
पोलिसांनी सांगितलं की, पीडित व्यक्तीची मेडीकल करुन त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवलय. चौकशी करुन योग्य कारवाई करु. पोलिसांनी किन्नर रवीना आणि विकासला ताब्यात घेतलं आहे. प्रकरणात पुढील कारवाई सुरु आहे.