दिवाळीतील फायरिंग आली अंगाशी, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणं पडलं महागात, आता खावी लागणार तुरुंगाची हवा

| Updated on: Jan 31, 2023 | 4:57 PM

दिवाळीच्या काळात फटाके फोडत असतांना आकाश संजय आदक या व्यक्तीने आपल्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार करून दिवाळी साजरी केली होती.

दिवाळीतील फायरिंग आली अंगाशी, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणं पडलं महागात, आता खावी लागणार तुरुंगाची हवा
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक शहर हद्दीत नाशिक पोलीसांनी केलेल्या एका कारवाईची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. खरंतर नाशिक शहर पोलिसांना दिवाळीच्या दरम्यान म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाला होता. त्यामध्ये परवाना असलेल्या बंदुकीतून एका व्यक्तीने फायरिंग करून व्हिडिओ शेअर केला होता. सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याने दिवाळी साजरी केली होती. हीच बाब नाशिक शहर पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यावरून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये आकाश संजय आदक असं फायरिंग केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्याच पोलिस कर्मचारी असलेल्या प्रशांत मरकड यांच्या निदर्शनास हा व्हिडिओ आला होता. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या सातपुर परिसरातील ध्रुवनगर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात फटाके फोडत असतांना आकाश संजय आदक या व्यक्तीने आपल्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार करून दिवाळी साजरी केली होती.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आकाश याने दिवाळी साजरी केली होती. दिवाळीच्या काळातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

हे सुद्धा वाचा

तोच व्हिडिओ गुन्हे शाखेचे कर्मचारी प्रशांत मरकड यांच्या निदर्शनास आला होता, त्यावरून त्यांनी तपास करत असतांना मोठी घटना उघडकीस आली आहे.

नाशिक शहरातील गुन्हे शाखेच्या वतिने त्याला अटक करण्यात आली असून परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याने अनधिकृत फायरिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी हा परप्रांतीय आहे. तो ज्या राज्यातील आहे तेथे सण आणि इतर कार्यक्रमात फायरिंग करणं क्षुल्लक बाब मानली जाते मात्र, महाराष्ट्रात तशी परवानगी नसल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीला प्रथा असल्याने त्याने फायरिंग करून जल्लोष केला मात्र महाराष्ट्रात तशी परवानगी नसल्याने गुन्हा दाखल झाला असून फायरिंग करणं भोवल्याची चर्चा होऊ लागली आहे. दीड लाखांची पिस्तूल त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.