AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिस्ट्री मॅनसोबत दिसली प्रसिद्ध अभिनेत्री; पापाराझींना पाहताच झटकला त्याचा हात, लपवला चेहरा

एका प्रसिद्ध अभिनेत्रीला पापाराझींनी मिस्ट्री मॅनसोबत पाहिलं. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होता. अभिनेत्री त्याच्या हातात हात घालून चालत असताना अचानक तिने पापाराझींना पाहिलं. आपला फोटो, व्हिडीओ काढला जात असल्याचं कळताच तिने हात झटकला.

मिस्ट्री मॅनसोबत दिसली प्रसिद्ध अभिनेत्री; पापाराझींना पाहताच झटकला त्याचा हात, लपवला चेहरा
मिस्ट्री मॅनसोबत दिसली प्रसिद्ध अभिनेत्रीImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 16, 2025 | 11:00 AM
Share

गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. हे पापाराझी हातात मोबाइल घेऊन सेलिब्रिटींचा पाठलाग करतात आणि त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करतात. त्यानंतर ते सोशल मीडियावर अपलोड केले जातात. अनेकदा पापाराझींकडून सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचंही उल्लंघन केलं जातं. यावर अनेकांनी आवाज उठवला आहे. परंतु सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्यामुळे जिम, पार्लर, सलॉन, रेस्टॉरंट, कॅफे, एअरपोर्ट अशा विविध ठिकाणी पापाराझी सेलिब्रिटींचा पाठलाग करतात आणि त्यांचे फोटो क्लिक करतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ पापाराझींकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ही अभिनेत्री मुंबईत एका मिस्ट्री मॅनसोबत हातात हात घालून चालताना दिसली. परंतु पापाराझी आणि त्यांचा कॅमेरा पाहताच तिने त्याचा हात झटकला आणि आपला चेहरा लपवला.

ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही सांगतोय, ती ‘अंग्रेजी मीडियम’ फेम राधिका मदन आहे. मुंबईतल्या एका रुग्णालयाबाहेर तिला मिस्ट्री मॅनसोबत पाहिलं गेलं. यावेळी दोघंही कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसले. दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. राधिका मिस्ट्री मॅनचा हात पकडून चालत होती. परंतु अचानक जेव्हा तिला समोर पापाराझी दिसले, तेव्हा तिने त्याचा हात सोडला आणि मागे चेहरा लपवला. त्यानंतर ती त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसली आणि तिथून शांतपणे निघून गेली. या संपूर्ण वेळी तिच्या चेहऱ्यावर मास्क लावलेलाच होता.

राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्यासोबत दिसलेला मिस्ट्री मॅन आहे तरी कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. राधिका त्या मुलाला डेट करतेय का, असाही सवाल काहींनी विचारला आहे. राधिकाने 2018 मध्ये ‘पटाखा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 2019 मध्ये ‘मर्द को दर्द नहीं होता’मध्ये दिसली. 2020 मध्ये ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. शिवाय राधिकाने ‘मोनिका: ओह माय डार्लिंग’, ‘कच्चे लिंबू’, ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’, ‘सरफिरा’ आणि ‘जिगरा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.