Video : कल्याणच्या शहाडमध्ये चक्क चप्पलांची चोरी, चप्पल चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद

शहाड रेल्वे स्थानकाजवळ नवरंग नावाची इमारत आहे. या इमारतीत असलेल्या एका दुकानात बुधवारी संध्याकाळी काही नागरिक कामानिमित्त बसले होते. मात्र यावेळी दुकानाच्या बाहेर आलेल्या एका चोरट्याने या चपला उचलून तिथून पळ काढला आहे.

Video : कल्याणच्या शहाडमध्ये चक्क चप्पलांची चोरी, चप्पल चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद
कल्याणच्या शहाडमध्ये चक्क चप्पलांची चोरी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2022 | 1:37 PM

कल्याण – चोरट्यांचा काही नेम नाही, ते कधी कुठे संधी मिळते याची वाट पाहत असतात. अनेकदा चांगल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चप्पला चोरीला जातात. कल्याणच्या (kalyan) शहाडमध्ये (shahad) चप्पला चोरी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. दुकानाच्या बाहेर इतरत्र कोणी आहे का ? यांचा अंदाज घेऊन चोरट्याने डल्ला मारल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. शहाडमध्ये एका इमारतीत लोक कामामध्ये जमले होते. तिथं कोणीही नसल्याचे पाहून चोरट्याने हे कृत्य केलं आहे. हा चोरटा गर्दुल्ला असावा, असा अंदाज आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओत

शहाड रेल्वे स्थानकाजवळ नवरंग नावाची इमारत आहे. या इमारतीत असलेल्या एका दुकानात बुधवारी संध्याकाळी काही नागरिक कामानिमित्त बसले होते. मात्र यावेळी दुकानाच्या बाहेर आलेल्या एका चोरट्याने या चपला उचलून तिथून पळ काढला आहे. हा चोरटा गर्दुल्ला असावा, असा अंदाज आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यावेळी हा चोरटा चप्पल चोरत होता. त्यावेळी त्याच्या बाजूला दोन कुत्रे दिसत आहेत. चप्पलांच्या बाजूला बसून आजूबाजूचा अंदाज घेत त्याने चप्पला घेऊन पोबारा केला आहे.

चप्पल चोरीला जात असल्याने नागरिक हैरान

अनेक दिवसांपासून चप्पला चोरीला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चप्पला का चोरीला जात आहेत. तसेच चप्पल चोरी कशी थांबेल असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.