AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकाने ठोकरल्याने वडाळा येथे घरकाम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

वडाळा दोस्ती एकर परिसरात भरधाव टॅक्सी चालकाने उडविल्याने घरकाम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, या महिलेला तीन लहान मुले असल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकाने ठोकरल्याने वडाळा येथे घरकाम करणाऱ्या महिलेचा मृत्यू
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 13, 2023 | 4:33 PM
Share

मुंबई : भरधाव काळ्या – पिवळ्या टॅक्सी चालकाने एका महिलेला जोरदार ठोकरल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  वडाळा येथील दोस्ती एकर परिसरात शनिवारी रात्री घडली आहे. यावेळी टॅक्सी चालकाने रस्त्यावरील पार्क केलेल्या वाहनालाही जोरदार धडक दिल्याने दोन वाहनांच्या मध्ये अडकलेल्या या महिलेचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास ती दोस्ती एकर परीसरातून चालली असताना तिला भरधाव काळ्या – पिवळ्या ओम्नी टॅक्सीने जोरदार धडक दिली.

वडाळा येथे घरकाम करणाऱ्या सुप्रिया कट्टीमनीगौडर ( वय 35 ) हीला शनिवारी रात्री ती घरकामासाठी जात असताना भरधाव टॅक्सी चालकाने चिरडले. या वेळी तिच्या सोबत चालत असलेली तीन मुले सुदैवाने बचावली. या परिसरात यापूर्वी भरधाव टॅक्सी चालकांच्यामुळे अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. ही महीला घर काम करुन आपाला उदरनिर्वाह करायची.

शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास ती दोस्ती एकर परीसरातून चालली असताना तिला भरधाव काळ्या – पिवळ्या ओम्नी टॅक्सीने जोरदार धडक दिली. ती एका घरात घरकामासाठी जात असताना तिला टॅक्सी चालकाने धडक दिली. टॅक्सी चालकाने तिच्या सोबत रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनालाही ठोकरले आहे. त्यामुळे दोन वाहनाच्या मध्ये अडकून सुप्रिया गंभीर जखमी झाली. ज्यावेळी ती चालली होती, त्यावेळी तिच्या सोबत तीन मुलेही होती त्यांचे प्राण मात्र सुदैवाने बचावले. या प्रकरणात टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली असून त्याची जामीनावर सुटका झाली आहे. या अपघातात या टॅक्सीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यावरून गाडीच्या वेगाचा अंदाज येत आहे. या गाडीची विंड स्क्रीन पूर्णपणे तुटली आहे.

 अनेकदा  टॅक्सी चालकांकडून अपघात

सुप्रिया हीला तीन मुले असून मोठा मुलगा तेरा वर्षांचा लहान मुलगा तीन वर्षांचा आहे. सुप्रिया ही खूपच मेहनती होती, असे येथील रहीवाशांनी म्हटले आहे. या ठिकाणी शेअर टॅक्सी चालक वेगाने गाड्या चालवित असून अनेकांचे वय खूप कमी असून ते नशेबाजी करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेकदा येथे टॅक्सी चालकांकडून अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.