दहावीतील विद्यार्थिनीवर 25 वर्षीय तरुणाचे वार, डोकं धडावेगळं होऊन जागीच गतप्राण

14 वर्षीय मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार होत असताना आरोपीने धारदार शस्त्राने तिच्या मानेवर वार केले. या हल्ल्याची भीषणता एवढी होती, की मुलीचे डोके जवळपास तिच्या शरीरापासून वेगळे झाले होते.

दहावीतील विद्यार्थिनीवर 25 वर्षीय तरुणाचे वार, डोकं धडावेगळं होऊन जागीच गतप्राण
crime News
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 11:20 AM

कोलकाता : 25 वर्षीय तरुणाने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. आरोपीच्या नसत्या मागण्या धुडकावून लावल्याने तिचा खून झाल्याचा आरोप आहे. उत्तर बंगालमधील आयपुरद्वार जिल्ह्यात बुधवारी हा प्रकार घडला.

14 वर्षीय मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार होत असताना आरोपी स्वपन बिस्वासने धारदार शस्त्राने तिच्या मानेवर वार केले. या हल्ल्याची भीषणता एवढी होती, की मुलीचे डोके जवळपास तिच्या शरीरापासून वेगळे झाले होते.

काय आहे प्रकरण?

14 वर्षीय मयत मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती. तिचे आई-वडील शेतमजुरीचे काम करतात. आयपुरद्वार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक भोलानाथ पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार “आरोपी स्वपन बिस्वासच्या घाणेरड्या मागण्या विद्यार्थिनीने अनेकदा धुडकावून लावल्या होत्या. याच रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली असावी.”

डोके शरीरापासून जवळपास विलग

पीडितेचे काका कालीचरण शील यांनी सांगितले की हल्ल्यानंतर काही सेकंदातच तिचा मृत्यू झाला. “स्वपन बिस्वासने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका क्रूर होता की तिचे डोके शरीरापासून जवळजवळ वेगळे झाले. ती जमिनीवर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.”

उज्ज्वल भविष्य असलेली विद्यार्थिनी

मुलगी शिक्षण घेत असलेल्या पारोंगर पर शिशु कल्याण उच्च विद्यालयातील तिच्या शिक्षिकेने सांगितले की “ती खूप चांगली विद्यार्थिनी होती आणि तिचे भविष्य खूप उज्ज्वल होते. तिचा अशा प्रकारे मृत्यू होईल, याची मी कल्पनाही करु शकत नाही” असं सांगतानाच तिच्या शिक्षिकेला रडू कोसळलं.

आरोपीविषयी आई-वडिलांना कल्पना

मुलीचे शेजारी प्रदीप कुमार शिल म्हणाले की “तिने तिच्या पालकांना बिस्वासच्या मागण्यांबद्दल सांगितले होते. पण तो तिला जीवे ठार मारेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. जवळपास दोन वर्षांनी शाळा पुन्हा सुरु झाल्यामुळे ती खुश होती. पण तिच्या स्वप्नांना त्या नराधमाने नख लावले” असे सांगताना शेजाऱ्यांचा आवाज कापरा झाला.

संबंधित बातम्या :

चौघा भावांचे केस कापण्यास न्हाव्याचा नकार, घरात घुसून भावंडांकडून निर्घृण हत्या

नाशकात भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून

इंटर्न डॉक्टरवर बंदूक ताणणारा युवक पुण्यात गेला, पुन्हा नागपुरात सापडला, आत्महत्या करण्याच्या तयारीत?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.