AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंटर्न डॉक्टरवर बंदूक ताणणारा युवक पुण्यात गेला, पुन्हा नागपुरात सापडला, आत्महत्या करण्याच्या तयारीत?

नागपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात घुसून पॅरा मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या युवतीवर विक्की चकोले या आरोपीने बंदूक ताणली होती. युवतीला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने बंदुकीचा चापही ओढला होता, मात्र गोळी झाडली गेली नाही आणि युवतीचे प्राण वाचले

इंटर्न डॉक्टरवर बंदूक ताणणारा युवक पुण्यात गेला, पुन्हा नागपुरात सापडला, आत्महत्या करण्याच्या तयारीत?
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 9:02 AM
Share

नागपूर : तीन दिवसांपूर्वी नागपूरच्या मेडिकलमध्ये पॅरा मेडिकल विभागातील इंटर्न डॉक्टरवर बंदूक ताणून तिला धमकवणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. नागपूरहून पळून आरोपी पुण्याला पोहोचला होता, तिथे तो आत्महत्या करण्याच्या तयारीत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपीने हे कृत्य का केलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात घुसून पॅरा मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या युवतीवर विक्की चकोले या आरोपीने बंदूक ताणली होती. युवतीला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने बंदुकीचा चापही ओढला होता, मात्र गोळी झाडली गेली नाही आणि युवतीचे प्राण वाचले. आरोपी मात्र पळून गेला होता.

पुण्याला पळून गेला

गुन्हे शाखेची सहा पथकं आरोपीचा शोध घेत होते, मात्र तो हाती येत नव्हता. गुरुवारी सकाळी तो रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी हा नागपूरवरून पुण्याला पळून गेला होता. दोन दिवस तिथे राहिला, मात्र त्याच्या जवळचे पैसे संपल्याने तो परत नागपुरात आला.

आत्महत्या करण्याच्या तयारीत?

आरोपी डिप्रेशनमध्ये असून आत्महत्या करण्याच्या तयारीत होता, मात्र वेळीच पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती मिळत आहे. पोलीस आता त्याने युवतीवर बंदूक का ताणली, त्या दिवशी नेमकं काय घडलं, याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

सोमवार 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपुरातील मेडिकलच्या अधिष्ठाता इमारतीच्या शेजारी असलेल्या ई लायब्ररीजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित इंटर्न महिला डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून बोलत नसल्यामुळे संतप्त आरोपी विकी चकोले याने तिला भेटण्यासाठी मेडिकलमधील ई-लायब्ररीजवळ बोलावले होते.

आरोपी आणि पीडिता हे दोघे जण बोलत असताना अचानक कुठल्या तरी कारणावरुन त्यांच्यात खटके उडाले. त्यावरुन काही कळण्याच्या आतच आरोपीने खिशातून बंदूक काढली आणि तरुणीच्या दिशेने बंदूक ताणून धरली. त्याने बंदुकीचा ट्रिगरही दाबला होता. मात्र सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

महिलेने लगेच आरडाओरडा केला, तेव्हा जवळपास असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. परंतु आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेमुळे मेडिकलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरोपी पकडला गेल्याने त्याला शिक्षा होईल, हे खरं मात्र मेडिकलसारख्या ठिकाणी बिनबोभाटपणे युवतीवर गन रोखली गेल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संबंधित बातम्या :

इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, फेसबुक फ्रेण्ड पसार

दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न, डोळ्यात नवीन संसाराची स्वप्नं, सत्यनारायणाची पूजा आटोपून नवरदेवाची आत्महत्या

सोशल मीडियावर फ्रेंडशीप, मोबाईल नंबर मागितला, मग थेट न्यूड कॉल, सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.