AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण येथे ‘एक बिहारी सबपर भारी’ वक्तव्यावरुन राजकीय वाद, ठाकरे गट आणि काँग्रेसचे प्रत्युत्तर

एकीकडे शिंदे गटाचे नेते अरविंद मोरे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे छठपूजेच्या व्यासपीठावरून सुरू झालेला ‘एक बिहारी सबपर भारी’चा वाद आता कल्याणच्या राजकीय वर्तुळात चांगलाच रंगला आहे.

कल्याण येथे ‘एक बिहारी सबपर भारी’ वक्तव्यावरुन राजकीय वाद, ठाकरे गट आणि काँग्रेसचे प्रत्युत्तर
balasaheb thackeray death anniversary
| Updated on: Nov 17, 2026 | 7:24 PM
Share

कल्याण येथे छटपुजेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे गटाचे नेते जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी ‘एक बिहारी सबपर भारी’ वक्तव्य केले होते. महाराष्ट्राला यूपी-बिहारमधील नागरिकांची गरज असल्याचं विधानही त्यांनी केले होते. त्यावर आता राजकारण पेटले आहे. ठाकरे गटाचे विजय साळवी यांनी आक्रमक होत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तर काँग्रेसनेही या वादात उतरत भाजपा आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

‘एक बिहारी सबपर भारी’ आणि यूपी-बिहारमधील नागरिकांची महाराष्ट्राला गरज असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केल्याने कल्याणमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मोरे यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मराठी अस्मितेची आठवण करून दिली आहे. तर अरविंद मोरे यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही ‘ना बिहारी भारी, ना गुजराती भारी, महाराष्ट्राची अस्मिता सर्वात भारी’ असं म्हणत भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त दोन्ही शिवसेना गटाचे पदाधिकारी एकत्र आले असतानाच या वक्तव्यावरून राजकीय वाद रंगला आहे.

अरविंद मोरे यांनी असं वक्तव्य करायला नको होतं. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. बाहेरून येणाऱ्या बिहारी नागरिकांना इथे एवढं महत्त्व दिलं जात असेल, तर ते धोकादायक आहे. त्यांनी आपल्या राज्यामध्ये उद्योगधंदे सुधारावेत. त्यांना इथे आणून उद्योगधंदे चालवण्याची वेळ का आली? बिहारी नागरिक नव्हते, तेव्हा महाराष्ट्रात उद्योगधंदे होत नव्हते का? तेव्हाही महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरू होते. मग महाराष्ट्र बिहारी नागरिकांवर किती अवलंबून आहे? यावेळी त्यांनी कोरोनाचे उदाहरण दिलं. कोरोनाच्या काळात परप्रांतीय आपल्या गावी निघून गेले. त्यावेळी त्यांना कुठलीही सुविधा मिळत नव्हती आणि प्रवासाची साधनंही सुरू नव्हती. जे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून निघून जातात, ते महाराष्ट्रप्रेमी आहेत का? त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणं आणि शिवसेनेच्या माणसांनी अशी भूमिका घेणं योग्य नाही. त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. मराठी माणसाचा विसर पडला असेल आणि ठाकरे कुटुंबाची विचारसरणी विसरले असतील, तर ही बाब निषेधार्ह असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजळ साळवी यांनी म्हटले आहे.

तर ठाकरे गटाच्या टीकेनंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी कोरोनामध्ये लोक त्यांच्या आई ,बहीण ,काका, बायको यांना बघायला जात नव्हते का ? सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी असते. काळजीपोटी हे सर्व होतं मात्र ज्या वेळेला उत्तर भारतीय नागरिक जेव्हा आपल्या गावी निघून गेले, तेव्हा खरोखर महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि बिल्डरांची बांधकामं बंद पडली होती. ही वास्तविकता आहे. वास्तविकता मांडण्यात काही गैर नाही मी नेहमी बेरजेचं राजकारण करतो जिथे जिथे बेरीज तिथे तिथे अरविंद मोरे असे सांगून ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, या वादात काँग्रेसनेही उडी घेत भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र ही भाजप आणि शिंदे गटाने विकत घेतलेली खासगी मालमत्ता नाही. हा महाराष्ट्र घडवण्यासाठी अनेक मराठी माणसांनी, अनेक मराठी बांधवांनी मोठा संघर्ष केला आहे. खूप कष्ट घेतले आहेत आणि सर्वाधिक बलिदान दिलं आहे. आम्हाला बिहारी माणसांचा अजिबात त्रास नाही. ते आपले भारतीय बांधव आहेत आणि आम्हाला त्यांचा सन्मान आहे. पण मला सांगा, सत्तेत बसून तुमचा काय उपयोग आहे, जेव्हा आपल्या मराठी माणसालाच स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो? तुम्ही फक्त निवडणुकीपूर्वी मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा वापर करता आणि जेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका येतात, तेव्हा ‘एक बिहारी सबपर भारी’ असं बोलता. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रात सर्वात पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे, होता आणि राहणार. हे कुठलीही सत्ता बदलू शकणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, ना बिहारी भारी, ना गुजराती भारी. महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे सर्व समान अधिकारी अशी टीकाही काँग्रेसचे युवक कल्याण अध्यक्ष जपजीत सिंग यांनी केली आहे.

Follow Us
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?