दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न, डोळ्यात नवीन संसाराची स्वप्नं, सत्यनारायणाची पूजा आटोपून नवरदेवाची आत्महत्या

बाहेर मंडपात जेवणाच्या पंगती सुरु असतानाच पांडुरंगने कुणालाही काही न सांगता थेट आपले शेत गाठले आणि तेथे आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. पांडुरंगने लग्नाच्या दिवशीच असे टोकाचे पाऊल का उचलले असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.

दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न, डोळ्यात नवीन संसाराची स्वप्नं, सत्यनारायणाची पूजा आटोपून नवरदेवाची आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र

बीड : दोन दिवसांपूर्वी अगदी थाटामाटात लग्न पार पडलं. अंगावरची हळदही उतरली नाही तोच नवरदेवाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. पांडुरंग डाके असे मयत नवरदेवाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसून पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सत्यनारायणाची पूजा संपन्न होताच नवरदेवाची आत्महत्या

पांडुरंग डाके(26) हा तरुण बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील रहिवासी आहे. पांडुरंग याचे माजलगाव येथील तरुणाशी लग्न ठरले. शनिवारी मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. नवीन जोडप्याच्या सुखी संसारासाठी आज सकाळी 10 वाजता सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजाही विधीवत आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नवीन आयुष्याची सुरुवात आणि भावी संसाराबाबत पांडुरंगही स्वप्नं रंगवत होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पूजा आटोपल्यानंतर पाहुणे मंडळींची जेवणावळ सुरु होती. बाहेर मंडपात जेवणाच्या पंगती सुरु असतानाच पांडुरंगने कुणालाही काही न सांगता थेट आपले शेत गाठले आणि तेथे आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. पांडुरंगने लग्नाच्या दिवशीच असे टोकाचे पाऊल का उचलले असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.

शेजाऱ्याने कुटुंबाला दिली माहिती

पांडुरंगच्या शेजारी राहणाऱ्या एका शेतकऱ्याने पांडुरंगला शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले. त्याने तात्काळ पांडुरंगच्या घरच्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्व नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्या सर्व काही ठीक असताना लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पांडुरंगने अचानक आत्महत्येसारखे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पोलीस याचा सखोल तपास करीत आहेत. (Groom commits suicide by hanging in Beed three days after marriage)

इतर बातम्या

फेसबुकवरुन शस्त्रास्त्रे, दारूगोळा विक्री, पोलीसही चक्रावले, जाणून घ्या काय आहे पाकिस्तानी लिंक

वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीवर बंदूक रोखली, गोळ्या झाडण्याचा प्रयत्न, नागपुरात खळबळ

Published On - 11:42 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI