वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीवर बंदूक रोखली, गोळ्या झाडण्याचा प्रयत्न, नागपुरात खळबळ

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकलमध्ये एका पॅरामेडिकल इंटर्न महिलेवर बंदूक रोखण्यात आलीय. या महिलेवर एका माथेफिरुने गोळ्या झाडण्याचादेखील प्रयत्न केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळावरुन फरार झालाय.

वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीवर बंदूक रोखली, गोळ्या झाडण्याचा प्रयत्न, नागपुरात खळबळ
nagpur gun firing
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 9:43 PM

नागपूर : यवतमळ जिल्ह्यात एका शिकाऊ डॉक्टरची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकलमध्ये एका पॅरामेडिकल इंटर्न तरुणीवर बंदूक रोखण्यात आलीय. या तरुणीवर एका माथेफिरुने गोळ्या झाडण्याचादेखील प्रयत्न केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडालीय. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याचे नाव विक्की चकोले असे आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधाची पार्श्वभूमी असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नेमकं काय घडलं ?

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक इंटर्न पॅरामेडिकल महिला मेडिकमलध्ये कामावर आहे. तिच्यावर विक्की चकोले या तरुणाने अचानकपणे पिस्तूल रोखले. हा तरुण फक्त एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने या तरुणीवर गोळ्या झाडण्याचादेखील प्रयत्न केलाय. मात्र यामध्ये तो अयशस्वी झाला. आपला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे समजल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

आरोपी तरुणीला ओळखतो

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विक्की चकोले हा तरुणीला ओळखतो. याच कारणामुळे या प्रकरणात प्रेमामध्ये तणाव किंवा इतर तत्सम पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

आरोपीने काढला पळ, पोलिसांकडून तपास सुरु

या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपीने पळ काढला असून पोलीस त्याला शोधत घेत आहेत. तसेच पुढील तपास करत आहेत. मात्र या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरची झाली होती हत्या

दरम्यान, याआधी 11 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका शिकाऊ डॉक्टरची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह महाविद्यालयातच आढळला होता. डॉ. अशोक पाल असे हत्या झालेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव होते. या घटनेनंतर यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली होती. विद्यार्थी रुग्णालयाचा मुख्य दरवाजा बंद करुन आंदोलनाला बसले होते.

इतर बातम्या :

Pune Crime |दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाची आईला मारहाण, तर भावाच्या छाती खुपसला भाला

अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या बोगस अ‍ॅमेझॉन कॉल सेंटरचा पर्दाफाश, नवी मुंबईत 7 जणांना बेड्या

ही कसली दुश्मनी ? 33 एकरातील भात पिकाच्या गंजीला लावली आग, भंडाऱ्यात असे काय झाले?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.