Pune Crime |दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाची आईला मारहाण, तर भावाच्या छाती खुपसला भाला

आरोपी सुनिल शिंदे याला दारूचे व्यसन आहे. घटनेदिवशी आरोपीने आईकडे दारूसाठी पैसे देण्याची मागणी केली. मात्र आईने पैसे द्यायला नकार दिल्याने आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी आईला मारहाण करत असल्याचे बघून आरोपीच्या भावाने आरोपीकडे तू आईला का मारतोयस अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने भावालाही मारण्यास सुरुवात केली.

Pune Crime |दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून  मुलाची आईला मारहाण, तर भावाच्या छाती खुपसला भाला
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण कधी काय करेल याचा नेम नसतो. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अशी अशी एका घटना समोर आली आहे. आईने दारू पिण्यास पैसे दिले नाही. या रागातून आईला मारहाण करत लहान भावाच्या छातीत भाला खुपसत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खेड तालुक्यातील पापळवाडी येथे ही घटना घडली आहे. याता लहान भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सुनिल शिंदे याला दारूचे व्यसन आहे. घटनेदिवशी आरोपीने आईकडे दारूसाठी पैसे देण्याची मागणी केली. मात्र आईने पैसे द्यायला नकार दिल्याने आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी आईला मारहाण करत असल्याचे बघून आरोपीच्या भावाने आरोपीकडे तू आईला का मारतोयस अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने भावालाही मारण्यास सुरुवात केली. मला जाब विचारतोस म्हणून आरोपीने लहान भावाच्या छातीत भाला खुपसला.

लहान भाऊ गंभीर जखमी लहान भावाने भाल्याच्या वार चुकवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या छातीला उजव्या बाजूला हाताला भाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपीने केलेल्या या हल्ल्यात लहान भाऊ आणि आई दोघेही जखमी झाल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आरोपी सुनिल शिंदे हा घटना स्थळावरून मोटार सायकलवरुन घेऊन पळून गेला.मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.

Maharashtra News LIVE Update | अहमदनगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात

एटीएममध्ये बिनधास्त धुसला अन् मशीन फोडू लागला, सायरन वाजता पळाला, औरंगाबादमध्ये एकजण ताब्यात

Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!

Published On - 6:10 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI