Pune | उरळीकांचन येथे भरदिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यू, 1 गंभीर

पुण्यात भर दिवसा दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात काल (21 ऑक्टोबर) महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असताना आज आणखी एक भयानक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. पुण्यात भर दिवसा दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण त्यांचा रुगणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेने मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे.

संबंधित घटना ही पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. ऊरळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराचा हा भयानक थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे अजिबात भय नसल्याचं हे पुन्हा एकदा समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भर चौकात गोळीबाराची घटना घडत नाही तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवला असं म्हणता येणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. पण आता पुण्यात थेट भर चौकात गोळीबाराच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आतातरी पोलीस यंत्रणा जागी होईल, अशी आशा सर्वसामान्यांकडून बाळगली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI