सोशल मीडियावर फ्रेंडशीप, मोबाईल नंबर मागितला, मग थेट न्यूड कॉल, सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न

ही महिला ऑनलाइन माध्यमातून सेवानिवृत्त मुख्याध्यापकावर लक्ष ठेवून होती. सोशल मीडियावर तिने आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फोन नंबर मागितला. फोन नंबर मिळाल्यानंतर तिने अचानक नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला.

सोशल मीडियावर फ्रेंडशीप, मोबाईल नंबर मागितला, मग थेट न्यूड कॉल, सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न
पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक

मुंबई : दक्षिण मुंबईतील एका शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकाला एका महिलेने न्यूड व्हिडिओ कॉल केल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग करून नंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करण्यात आला. पैशांची मागणी करण्यात आली. आरोपी महिलेने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला ऑनलाइन माध्यमातून सेवानिवृत्त मुख्याध्यापकावर लक्ष ठेवून होती. सोशल मीडियावर तिने आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फोन नंबर मागितला. फोन नंबर मिळाल्यानंतर तिने अचानक नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला. फोन रिसिव्ह केल्यावर रेकॉर्ड केला आणि नंतर पैशांची मागणी करू लागली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि बलात्कार प्रकरणात गोवण्याची धमकी दिली. मुंबईच्या खार पश्चिम भागात राहणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने या घटनेनंतर 17 नोव्हेंबरला तक्रार दाखल केली.

मुख्याध्यापक सेक्सटोर्शनच्या जाळ्यात अडकले!

2002 मध्ये निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकाने खार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. निवृत्तीनंतरही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जोडले गेले आहेत. कलेशी संबंधित अनेक गोष्टी ते सोशल मीडियावर अपलोड करत असतात. 10 नोव्हेंबरला एका महिलेने त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने सांगितले की ती ब्युटी पार्लरमध्ये काम करते. महिलेने मुख्याध्यापकांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे’ असा मॅसेज तिने पाठवला.

आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, नंतर नंबर पाठवला आणि न्यूड व्हिडिओ कॉल केला

आधी या महिलेशी मुख्याध्यापकाची कोणतीच ओळख नव्हती. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही. यानंतर महिलेने तिचा फोन नंबर सोशल मीडियावर शेअर केला आणि तिला तातडीने बोलायचे आहे, असा मेसेज केला. प्रिन्सिपलच्या म्हणण्यानुसार काहीतरी महत्त्वाचे काम असेल त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी त्यांचा नंबरही शेअर केला. दुसऱ्या दिवशी संबंधित महिलेने मेसेज केला. मात्र मुख्याध्यापकांनी त्या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. यानंतर तिने 12 नोव्हेंबरला थेट व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी ती नग्न अवस्थेत होती. प्राचार्यांनी लगेच कॉल कट केला.

या घटनेनंतर दोन दिवसांनी आरोपी महिलेचे फोन येऊ लागले. आरोपी महिलेने धमकावत व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केल्याचे सांगितले. यानंतर ती ब्लॅकमेल करु लागली. संबंधित महिलेने तिच्यावर बलात्काराचा आरोप करून व्हिडिओ रेकॉर्डिंग पत्नी आणि मुलाला पाठवण्याची धमकी दिली. यानंतर मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सायबर सेलच्या मदतीने पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. (Attempt to blackmail retired headmaster by making nude call)

इतर बातम्या

Pune Crime |दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाची आईला मारहाण, तर भावाच्या छाती खुपसला भाला

अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या बोगस अ‍ॅमेझॉन कॉल सेंटरचा पर्दाफाश, नवी मुंबईत 7 जणांना बेड्या

Published On - 6:27 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI