AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mob lynching | साधूंच्या जटा खेचल्या, निर्वस्त्र करुन काठीने मारहाण…पालघरसारख कांड, BJP ने व्हिडिओबद्दल काय म्हटलय? Video

Mob lynching | भाजपा नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लेटफार्म एक्स वर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात संतप्त जमाव भगवा कपडे परिधान केलेल्या साधूंचे केस ओढताना दिसत आहे. निर्वस्त्र करुन मारहाण करण्यात आली. तिथे उपस्थित काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला.

Mob lynching | साधूंच्या जटा खेचल्या, निर्वस्त्र करुन काठीने मारहाण...पालघरसारख कांड, BJP ने व्हिडिओबद्दल काय म्हटलय? Video
Mob lynching of sadhu
| Updated on: Jan 13, 2024 | 10:22 AM
Share

कोलकाता : साधूंच्या मॉब लिंचिंगच प्रकरण समोर आलय. भाजपाने महाराष्ट्रातील पालघर सारख हे प्रकरण असल्याच म्हटलं आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करुन पश्चिम बंगालमध्ये पालघसारखी घटना घडल्याचा दावा केला आबे. मकर संक्रांतीसाठी गंगासागरला चाललेल्या साधूंना टीएमसी कार्यकर्त्यांनी निर्वस्त्र करुन मारहाण केली. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यामधील ही घटना असल्याचा भाजपाचा दावा आहे. अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना थेट टार्गेट केलय. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात शाहजहां शेख सारख्या दहशतवाद्यांना संरक्षण मिळत असं त्यांनी म्हटलं आहे. “बंगालमध्ये खुलेआम साधुंच्या हत्येचा प्रयत्न होतोय. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असण अपराध आहे” असं मालवीय म्हणाले आहेत. या व्हिडिओवरुन लोकांनी पुन्हा एकदा ममता सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.

भाजपा नेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतय की, संतप्त जमाव भगवा कपडे परिधान केलेल्या साधूंचे केस ओढत आहे. साधूंना निर्वस्त्र करुन लाठया, काठ्यांनी मारहाण केली जात आहे. साधू स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच ते दया याचनेची मागणी करत आहेत. पण संतप्त जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीय. त्यांच्याकडून मारहाण सुरु आहे. पीडित साधूसोबत भगवे कपडे घातलेला आणखी एक व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसतोय.

घटनेला महाराष्ट्रातील पालघरशी जोडलं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबद्दल पोलिसांनी अजून अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही. साधूंसोबत झालेल्या या मॉब लिंचिंगच्या घटनेवरुन भाजपा थेट ममता सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाने या घटनेला महाराष्ट्रातील पालघरशी जोडलं आहे.

पालघरमध्ये काय घडलेलं?

16 एप्रिल 2020 रोजी 72 वर्षीय संत महाराज कल्पवृक्ष गिरी आणि 35 वर्षाचे सुशील गिरी महाराज यांचा संतप्त जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. दोन्ही साधू आपल्या गुरुच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी मुंबईवरुन सूरतला चालले होते. दोन्ही साधूंवर मुल चोरीचा आरोप करत जमावाने त्यांची हत्या केली होती.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.