AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉरेन्स बिश्नोईची थेट चौकशी का करत नाही मुंबई पोलीस ? केंद्राचा तो आदेश… छोटा राजनला देखील हाच नियम…

पंजाब ते राजस्थान, महाराष्ट्र आणि एवढेच काय तर परदेशातील अनेक प्रकरणात हवा असलेला लॉरेन्स बिश्नोईल साल २०२३ पासून अहमदाबादच्या साबरमती तरुंगात बंद आहे.

लॉरेन्स बिश्नोईची थेट चौकशी का करत नाही मुंबई पोलीस ? केंद्राचा तो आदेश... छोटा राजनला देखील हाच नियम...
Lawrence Bishnoi and chhota rajan
| Updated on: Oct 21, 2026 | 10:09 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर रविवारी जुहूत झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई साबरमतीच्या तरुंगात बंद आहे. मात्र, पोलिस पोलिसांनी त्याची मागे सलमान खान याच्या घरावरील गोळीबार आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्ये प्रकरणात चौकशी करु शकली नाही असे म्हटले जात आहे. या चौकशीच्या आड केंद्राचा एक आदेश असल्याचे म्हटले जात आहे. हा आदेश नेमका काय आहे ?

मुंबई पोलिस गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी करु शकत नाही. गेल्या तीन वर्षात मुंबई शहरात घडलेल्या किमान चार मोठे गुन्ह्यात लॉरेन्स बिश्नोई या टोळीचे नाव पुढे आले आहे. ताजे प्रकरण अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवरील गोळीबाराचे आहे, ज्यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात शुटर सह एकूण दहा जणाना देशातील विविध ठिकाणांवरुन अटक करण्यात आली आहे. केंद्रिय गृह मंत्रालयाच्या एका आदेशामुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांना साबरमती जेलमधून ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईत आणि इतरत्र नेता येत नाही.

केंद्राच्या आदेशाने लागली वाट

केंद्राने ऑगस्ट २०२३ मध्ये ‘क्रिमिनल प्रोसिजर कोड’ (CrPC) च्या कलम 268 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार अन्य एजन्सीद्वारा चौकशी साठी लॉरेन्स बिश्नोई याला तुरुंगातून बाहेर नेण्यास बंदी आहे. आता सीआरपीसीच्या जागा घेणाऱ्या ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) च्या कलम ३०३ नुसार देखील हा आदेश लागू आहे. या आदेशामुळे कोर्टाने जारी केलेले प्रोडक्शन वॉरंट आणि तपास यंत्रणांची आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची इच्छा पूर्ण होत नाही.

केंद्राने का घेतला निर्णय ?

केंद्र सरकारचे म्हणणे आहे की हे पाऊल सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि एका जागेवरुन दुसऱ्या जागी नेताना हिंसेची जोखीम टाळण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. जर एखाद्या तपास यंत्रणेला लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी करायची असेल तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हिडीओ लिंकद्वारे किंवा तरुंग परिसरात आत जाऊनच चौकशी करता येईल असे म्हटले जात आहे.

छोटा राजन यालाही सुरक्षा

लॉरेन्स बिश्नोई हा पहिलाच कैदी नाही ज्याला अशी सुरक्षा देण्यात आली आहे. २०१५ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला देखील अशाच प्रकारची सुरक्षा देण्यात आली आहे. इंडोनेशियात अटक झाल्यानंतर आणि भारतात आणण्यानंतर छोटा राजन याला तिहार तरुंगात पाठवण्यात आले होते. तिहार तरुंगात मुलाखतीत राजनने दावा केला होता की मुंबईत त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. कारण मुंबई पोलिस दलातील काही अधिकारी त्याचा शत्रू दाऊद इब्राहिमसाठी काम करत आहेत.

लॉरेन्स बिश्नोई याचा छोटा भाऊ अनमोल देखील दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. गेल्यावर्षी अमेरिकेतून अनमोल बिश्नोई याला भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला तिहार येथे ठेवण्यात आले आहे.

२०२३ पासून साबरमतीत बंद

साल २०२४ मध्ये त्याच्या टोळीच्या गुंडांनी अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई याच्या चौकशीची गरज लागली होती. साल २०२४ मध्ये दसऱ्याच्या दिवशीच वांद्र्यात एनसीपीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव आले होते. चित्रपट निर्माता रोहित शेट्टी याला देखील खंडणीसाठी धमक्या आल्या होत्या. पंजाब ते राजस्थान, महाराष्ट्र आणि परदेशातील अनेक प्रकरणात हवा असलेला लॉरेन्स बिश्नोईल साल २०२३ पासून अहमदाबादच्या साबरमती तरुंगात बंद आहे.

कस्ठडीतील चौकशी महत्वाची

या सर्व प्रकरणात मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची कस्ठडी घेता आली नव्हती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची व्हर्च्युअल चौकशी करुन काही उपयोग नाही. अशा प्रकरणात आरोपीला ताब्यात घेऊनच त्याची नीट चौकशी करता येते असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?