AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यायाम करताना पैलवान खाली कोसळला, तात्काळ रुग्णालयात नेले मात्र…

तालमीत नेहमीप्रमाणे व्यायाम करत असताना पैलवानाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पुण्यात घडली. पैलवानाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला.

व्यायाम करताना पैलवान खाली कोसळला, तात्काळ रुग्णालयात नेले मात्र...
व्यायाम करताना पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 08, 2023 | 3:27 PM
Share

पुणे / अभिजीत पोते : व्यायाम करत असताना पैलवानाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पुण्यात घडली आहे. पैलवानाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्वप्नील पाडाळे असे 31 वर्षीय मयत पैलवानाचे नाव आहे. पुण्यातील मारुंजी येथील कुस्ताच्या तालमीत आज सकाली 7.30 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. स्वप्नीलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.

सराव करत असताना हृदयविकाराचा झटका आला

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली कोसळला.

तात्काळ रुग्णालयात नेले मात्र उशिर झाला होता

स्वप्नीन अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमितील इतर लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून, तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट