अनैतिक संबंधाचे फोटो पाहिल्याने पतीचा संताप, पत्नीला जिवंत पेटवलं

आरोपी पतीचे अन्य महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांचे फोटो पत्नीने मोबाईलमध्ये पाहिले, याच रागातून पतीने तिला पेटवल्याचा आरोप आहे.

Ahmednagar Husband Set Wife on Fire, अनैतिक संबंधाचे फोटो पाहिल्याने पतीचा संताप, पत्नीला जिवंत पेटवलं

अहमदनगर : आपल्या अनैतिक संबंधांचे फोटो पाहिल्याच्या रागातून पतीने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीवर पेट्रोल टाकून पतीने तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार (Ahmednagar Husband Set Wife on Fire) अहमदनगरमध्ये समोर आला आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये युवतीला जाळल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील अनेक भागात महिला जळीतकांडाचे प्रकार समोर येत आहेत. नगरमध्येही अशीच हादरवून सोडणारी घटना घडली आहे.

आरोपी पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. संबंधित महिलेसोबत पतीचे फोटो पत्नीने मोबाईलमध्ये पाहिले. याच रागातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचा आरोप आहे.

नेवासे तालुक्‍यातील मोरेचिंचोरा गावात ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोनई पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त (Ahmednagar Husband Set Wife on Fire) केला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *