लातुरात काँग्रेस आमदाराच्या मुलावर चाकूहल्ला

लातूर : लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला. विश्वजित भिसे असे आमदार त्र्यंबक भिसेंच्या मुलाचे नाव आहे. विश्वजित यांच्यावर काल (4 मे) रात्री 9 वाजता चाकूने हल्ला करण्यात आला असून, यात विश्वजित गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यवार खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेतीच्या वादातून विश्वजित भिसेंवर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला …

लातुरात काँग्रेस आमदाराच्या मुलावर चाकूहल्ला

लातूर : लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला. विश्वजित भिसे असे आमदार त्र्यंबक भिसेंच्या मुलाचे नाव आहे. विश्वजित यांच्यावर काल (4 मे) रात्री 9 वाजता चाकूने हल्ला करण्यात आला असून, यात विश्वजित गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यवार खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शेतीच्या वादातून विश्वजित भिसेंवर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असल्याचे समोर आले आहे.

विश्वजित भिसेंवरील हल्ल्याबाबत लातुरातील रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटकही करण्यात आली आहे.

त्र्यंबक भिसे हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 अशा दोनवेळा त्र्यंबक भिसे लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्यासंदर्भात ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी सुरु केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *