शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू

शिकारीला गेलेल्या तरुणाला बंदुकीची गोळी (Boy death during hunting in ratnagiri) लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला आहे.

शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू

रत्नागिरी : शिकारीला गेलेल्या तरुणाला बंदुकीची गोळी (Boy death during hunting in ratnagiri) लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना 4 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील देवघर जंगलात घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. सिद्धेश संतोष गुरव (21) असं या मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान हा अपघात की घातपात (Boy death during hunting in ratnagiri) याची सध्या पोलिस चौकशी करत आहेत.

सिद्धेशच्या डाव्या हाताच्या पंजातून गोळी आरपार जात तोंडाच्या डाव्या बाजूला लागली. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सिद्धेशचा मृत्यू झाला आहे. तसेच डाव्या हातामध्येच 12 बोरची सिंगल काडतूसाची बंदूक मृतदेहाशेजारी आढळून आली. गुहागर पोलिसांनी प्राथमिक अपघात म्हणून नोंद केली असून मृत सिद्धेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात पाठवला आहे.

सिद्धेश एकटा जंगलात गेला नव्हता. त्याच्यासोबत त्याचे मित्रही असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिद्धेशच्या मृतदेहाजवळील रायफल जप्त केली असून ही रायफल नेमकी कुणाच्या मालकीची आहे की चोरीची आहे याचा तपास सुरु आहे.

सिद्धेशला गोळी लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला वेळीच दवाखान्यात नेले असते तर कदाचित जीव वाचू शकला असता. मात्र जिवलग मित्र स्वतःला वाचवण्यासाठी सिद्धेशला जखमी अवस्थेत टाकून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

18 ते 20 वयाच्या मुलांच्या हातात बंदुका येतात तरी कशा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. गावटी बंदूके बनवणारे कारखाने यापूर्वीच गुहागर पोलिसांनी उद्धवस्त केले आहेत. या प्रकरणात वापरलेली बंदूकही कोणाच्या मालकीची असल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण तरुण मुलांच्या हातात बंदुका येऊ लागल्याने पालकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे सिद्धेशच्या घरच्यांनाही आपल्या मुलाकडे बंदूक असल्याचे माहित नव्हते. ज्या बंदुकीने सिद्धेशचा बळी गेला आहे. अशाच प्रकारच्या बंदुकीने चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे सुद्धा शिकारीला गेलेल्या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *