Chhota Shakeel | छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचाही मृत्यू, महिनाभरात दोन्ही बहिणी 'कोरोना' बळी

छोटा शकीलची धाकटी बहीण फहमिदा हिचे 20 मे रोजी निधन झाले होते. तर त्याची मोठी बहीण हमीदा हिचाही कोरोनाने मृत्यू झाला (Chhota Shakeel Elder sister dies of COVID)

Chhota Shakeel | छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचाही मृत्यू, महिनाभरात दोन्ही बहिणी 'कोरोना' बळी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याची मोठी बहीण हमीदा सय्यदचा ‘कोरोना’ने मृत्यू झाला. धाकट्या बहिणीच्या मृत्यूला महिना उलटण्याआधीच मोठ्या बहिणीनेही डोळे मिटले. हमीदा सय्यदचा मुंब्रा येथील रुग्णालयात मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. (Chhota Shakeel Elder sister dies of COVID)

57 वर्षीय हमीदावर गेल्या आठवड्यापासून ‘कोरोना’चे उपचार सुरु होते. छोटा शकीलची धाकटी बहीण फहमिदा हिचे 20 मे रोजी मीरा रोड येथील रुग्णालयात निधन झाले होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान तिनेही अखेरचा श्वास घेतला होता. ‘मुंबई मिरर’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

छोटा शकीलच्या पाच भावंडांपैकी हमीदा दुसरी. तिचे लग्न मुंब्रा येथील व्यापारी फारुक सय्यद याच्याशी झाले होते. फारुखचे कोणतेही अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही. तो गुन्हेगारी विश्वापासून लांब असल्याचे मानले जाते.

भावंडांमध्ये शकीलचा क्रमांक तिसरा लागतो. तर त्यांची धाकटी बहीण फहमिदा हिचा निकाह आरिफ शेखशी झाला होता. छोटा शकीलसह  आरिफही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा हस्तक होता.

हेही वाचा : Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही!

फहमिदा यापूर्वी पती आरिफसोबत दुबईत राहत होती. 2006 मध्ये खंडणीच्या प्रकरणात आरिफला मुंबईला आणल्यानंतर ती भारतात परतली आणि तिचे कुटुंब मीरा रोडमध्येच स्थायिक झाले.

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आरिफने मीरा भाईंदर परिसरातील मालमत्ता व्यवसायात हात धुतले. दोन वर्षांपूर्वी खंडणीखोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील सध्या त्याच्या कुटुंबासह पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहत असल्याचे बोलले जाते. त्याचे इतर दोन भाऊही आपल्या कुटुंबियांसह पाकिस्तानात राहत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा आहे. अनेकजण याबाबतचे अंदाज वर्तवत आहेत, मात्र सरकारने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. अनेक सोशल साईट्सवर दाऊदच्या मृत्यूचं वृत्त पसरलं आहे, मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (Chhota Shakeel Elder sister dies of COVID)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *