AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहेरी गेलेल्या पत्नीचा फोटो फेसबुकवर पाहून संताप, तीन मुलांची हत्या करुन पित्याची आत्महत्या

धारदार हत्याराने त्यांच्या गळ्यावर वार करुन या पित्याने आपल्या मुलांचा जीव घेतला. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार करुन आत्महत्या केली.

माहेरी गेलेल्या पत्नीचा फोटो फेसबुकवर पाहून संताप, तीन मुलांची हत्या करुन पित्याची आत्महत्या
| Updated on: Jun 28, 2020 | 6:36 PM
Share

वसई : नालासोपाऱ्यात जन्मदात्या पित्यानेच आपल्या (Father Brutally Killed Three Children) तीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. धारदार हत्याराने त्यांच्या गळ्यावर वार करुन या पित्याने आपल्या मुलांचा जीव घेतला. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार करुन आत्महत्या केली. लॉकडाऊनच्या काळात सोडून गेलेल्या पत्नीचा फोटो दुसऱ्याच्या फेसबुकवर पाहून रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे (Father Brutally Killed Three Children).

याप्रकरणी पित्यावर हत्येचा आणि आत्महत्येचा गुन्हा तुळिंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तुळिंज पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या हत्याकांडात 12 वर्षांचा नयन, 7 वर्षांची नदनी आणि 3 वर्षांची नयना या चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 35 वर्षांचा कैलास परमार, असे हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव आहे (Father Brutally Killed Three Children). नालासोपारा पूर्वेकडिल डॉन लेन बाबुलपाडा परिसरात श्वेता कॉलनीमध्ये कैलास परमार यांनी राहत्या घरी आपल्या मुलांची हत्या करुन आत्महत्या केली. शनिवारी (27 जून) रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना उघड झाली.

आपल्याच चिमुरड्यांची हत्या करुन आत्महत्या करणारा कैलास परमार हा आपल्या कुटुंबियांसोबत भाड्याने राहात होता. पत्नीसोबत तो लसूणचा व्यवसाय करत होता. लॉकडाऊनच्या काळात घरातील कौटुंबिक वादातून त्याची पत्नी दीड महिन्यांपूर्वी एका मुलासह पतीला सोडून आपल्या माहेरी गेली. कैलास परमार तीन मुलांसह राहात होता.

त्याच्या पत्नीचा फोटो एका व्यक्तीच्या फेसबुकवर त्याने पाहिला. पत्नी सोडून गेली, तिचा फोटो दुसऱ्याच्या फेसबुकवर दिसल्याने त्याने तणावाखाली या हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सध्या कैलास परमार याच्यावर गुन्हा दाखल करुन नालासोपाऱ्यातील तुळिंज पोलीस याचा तपास करत आहेत (Father Brutally Killed Three Children).

संबंधित बातम्या :

Baramati Crime | बारामतीत चालकासह ट्रक पळवला, साडेचार कोटींच्या सिगारेटची चोरी, 7 जणांना अटक

यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक

Follow Us
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.