मरण कोणाला आवडतं? मी खूप जगले, पण आता नको, 24 वर्षीय विवाहितेचा गळफास

नाशिकमध्ये एका 24 वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Nashik Married Women Suicide) आहे.

मरण कोणाला आवडतं? मी खूप जगले, पण आता नको, 24 वर्षीय विवाहितेचा गळफास

नाशिक : नाशिकमध्ये 24 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “मरण कोणाला आवडतं, मी खूप जगले, पण आता नको,” अशी सुसाईड नोट तिने लिहिली आहे. त्यामुळे पोलिसांसह नातेवाईकही चक्रावले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Nashik Married Women Suicide)

सिडकोच्या पाटीलनगरमध्ये राहणाऱ्या वर्षा अहिरे या विवाहितेने काल गुरुवारी (25 जून) राहत्या घरी पंख्याला दोरी बांधत गळफास घेत आत्महत्या केली. तिला त्रिमूर्ती चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली.

“मरण कोणाला आवडतं, पण मला आता जगायचं नाही, खूप जगले मी आता नको वाटतं, कोरोनामुळे एक गोष्ट समजली, माणसं कशी असतात,” असे त्या महिलेने चिठ्ठीत लिहिलं आहे. तसेच या चिठ्ठीत तिने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. ही सुसाईड नोट बघून नातेवाईकांसह पोलिसही चक्रावले आहेत.

या प्रकरणी महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तसेच तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तिच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी तिच्या अंत्यविधीनंतर याबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई करु, असे आश्वासन नातेवाईकांना दिले आहे. (Nashik Married Women Suicide)

संबंधित बातम्या : 

शिर्डीत साईमंदिराजवळ व्यावसायिकाची आत्महत्या, स्वत: च्या दुकानातच गळफास

Nagpur Crime | नागपुरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या, तडीपार आरोपीसह तिघांना अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *