Nagpur Crime | नागपुरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या, तडीपार आरोपीसह तिघांना अटक

शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी क्वॉटर परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली घडली आहे.

Nagpur Crime | नागपुरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या, तडीपार आरोपीसह तिघांना अटक

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे (Nagpur Murder). शहरात आणखी एक खुनाची घटना घडली आहे. शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी क्वॉटर परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली घडली आहे. गौरव खडतकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. गौरवचा खून केल्याप्रकरणी सक्करदारा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चौघांपैकी एक तडीपार आरोपी असल्याची माहिती आहे (Nagpur Murder).

सक्करदरा भागातील सोमवारी क्वॉटर परिसरात गौरव खडतकर राहायचा. त्याच परिसरात कार्तिक चौबे नावाचा तरुण राहायचा. या दोघांमध्ये जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री (22 जून) सोमवारी क्वॉटर परिसरातील शाहू गार्डन परिसरात गौरव खडतकर आणि कार्तिक एकमेकांसमोर आले. त्यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला. त्यावेळी कार्तिक चौबे आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी लाकडी राप्टर, दगड, फर्शीने डोक्यात वार करत गौरवचा खून केला (Nagpur Murder).

या प्रकरणातील मुख्य आरोपी कार्तिक चौबे हा गुन्हेगारी स्वरुपाचा असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. गौरवच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कार्तिक चौबे, शहबाज उर्फ बाबु मुस्तफा खान, राजा उर्फ साहील शेख बाबा आणि मृणाल गिरीष भापकर यांचा समावेश आहे.

मुख्य आरोपी कार्तिक चौबे याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर त्याने दुकाची नेल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे कार्तिक चौबेवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे (Nagpur Murder).

संबंधित बातम्या :

कोरोना पॉझिटिव्ह भासवलं, क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून 21 वर्षीय तरुणीची छेडछाड

बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *