जन्मदात्या आईकडून आठ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या

जन्मदात्या आईनेच आठ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या (Mother murdered child) केली. ही धक्कादायक घटना मुंबईजवळील बदलापूर येथे घडली.

जन्मदात्या आईकडून आठ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या

ठाणे : जन्मदात्या आईनेच आठ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या (Mother murdered child) केली. ही धक्कादायक घटना मुंबईजवळील बदलापूर येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक नैराश्यातून आईने मुलाची हत्या (Mother murdered child) केली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. शीतल मणेरे असं आरोपी आईचे नाव आहे.

गेल्या दोन वर्षांपासून आरोपी आई पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर ती बदलापूरच्या आपटेवाडी भागात आठ वर्षीय मुलगा अर्णवसोबत राहत होती. अर्णव मणेरे हा बदलापुरच्या एका खासगी शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता. गुरुवारी (24 ऑक्टोबर) पहाटे अर्णव हा झोपेत असताना शितलने त्याचा गळा दाबून हत्या केली.

“हा प्रकार समोर येताच बदलापूर पोलिसांनी या आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या. शितलची मानसिक स्थिती ठीक नसून तिने दोन वर्षांपूर्वी आपल्यावरही अशाचप्रकारे जीवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे तिला शिक्षा देऊन माझ्या मुलाला न्याय द्या”, असं अर्णवचे वडील वैभव मणेरे यांनी सांगितले.

आरोपी आई कुठल्या तरी मानसिक आजाराने त्रस्त असल्याने मुलाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक करुन कोर्टात हजर केले असता कोर्टाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *