KKR vs PBKS : पंजाब किंग्सने KKR ला इतकं मारलं, इतकं मारलं, की…ध्वस्त झाले इतके सारे रेकॉर्ड्स

KKR vs PBKS : पंजाब किंग्सने काल कोलकाता नाइट रायडर्सला त्यांच्या होम ग्राऊंडवर धक्का दिला. PBKS च्या फलंदाजांनी सनसनाटी खेळ दाखवला. त्यांनी T20 क्रिकेटच्या इतिहासातील धावांचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने फक्त विजयाचा रेकॉर्ड केला नाही, तर रेकॉर्ड्सची रांग लावली. त्यावर एकदा नजर मारा.

KKR vs PBKS : पंजाब किंग्सने KKR ला इतकं मारलं, इतकं मारलं, की...ध्वस्त झाले इतके सारे रेकॉर्ड्स
jonny bairstowImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 9:27 AM

IPL 2024 चा सीजन सुरु होण्याआधी कोणी असा दावा केला असता की, या सीजनमध्ये मोठ-मोठे रेकॉर्ड होणार आहेत, एकदा नाही, अनेकदा रेकॉर्ड बनणार, तर फार कमी लोकांना विश्वास बसला असता. आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त स्कोर आव्हानात्मक लक्ष्य समजलं जातं. पण यंदाच्या सीजनमध्ये अनेक टीम्स सातत्याने 200 पेक्षा जास्त धावा करत आहेत. काल कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामन्यात कमालच झाली. 250 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यात आला. महत्त्वाच म्हणजे 19 व्या ओव्हरमध्येच विजयी लक्ष्य गाठलं. असं होईल, हा तर कोणीच विचार केला नसेल. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सने हे करुन दाखवलं. पंजाबच्या फलंदाजांनी तुफानी बॅटिंग केली. त्यांनी 262 धावा चेज करुन नवीन इतिहास रचला.

KKR च्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर ही मॅच झाली. कोलकात्याने पंजाबला विजयासाठी 262 धावांच टार्गेट दिलं होतं. पंजाबच्या टीमने फक्त 2 विकेट गमावून 18.4 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. जॉनी बेयरस्टो रन चेजमध्ये हीरो ठरला. त्याने शानदार 108 धावा बनवल्या. शशांक सिंहने जबरदस्त फिनिशिंग टच दिला. अशा प्रकारे पंजाबने फक्त IPL च नाही, तर टी20 क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड मोडले.

पंजाबने फक्त IPL च नाही, T20 च्या इतिहासात सर्वात मोठ लक्ष्य चेज करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. हा रेकॉर्ड आधी दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. त्यांनी मागच्यावर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध 259 धावा चेज केल्या होत्या. IPL मध्ये सर्वाधिक धावसंख्या चेंज करण्याचा रेकॉर्ड राजस्थानच्या नावावर होता. त्यांनी दोनवेळा 224 धावांच लक्ष्य चेज केलय. याच सीजनमध्ये केकेआर विरुद्ध त्यांनी एकदा हा कारनामा केला.

केकेआरने पहिली बॅटिंग करताना 261 धावा बनवल्या. ईडन गार्डन्समधील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. 2 तासांच्या आता पंजाबने हे सर्व रेकॉर्ड मोडून 262 धावा केल्या.

या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनी मिळून एकूण 42 सिक्स मारले. जो कुठल्याही T20 सामन्यात सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड आहे. मागचा रेकॉर्ड सुद्धा (38) चालू सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबाद-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि हैदराबाद-मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये झाला होता.

इतकच नाही जॉनी बेयरस्टो (9 सिक्स), शशांक सिंह (8), प्रभसिमरन सिंह (5) आणि राइली रूसो (2) या सगळ्यांनी मिळून पंजाबकडून एकूण 24 सिक्स मारले. IPL च्या एका इनिंगमधील हे सर्वाधिक सिक्स आहेत.

या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनी मिळून 523 धावा केल्या. संयुक्तरित्या दुसऱ्ंयांदा इतक्या धावा झाल्या आहेत. याआधी मुंबई-हैदराबाद मॅच मध्येही इतक्याच धावा झाल्या होत्या.

या मॅचमध्ये दोन्ही टीम्सकडून दोन्ही ओपनर्सनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या. आयपीएलमध्ये पहिल्यांदा असं झालय. केकेआरकडून सुनील नरेन (71) आणि फिल सॉल्टने (75) कमाल केली. पंजाबकडून प्रभसिमरन सिंह (54) आणि बेयरस्टोने (108) धावा केल्या.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.