AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन नांदगावकर यांच्या नावावर खंडणी, घराचा ताबा मिळवूण देण्याच्या नावाखाली दीड लाखांना गंडा

शिवसेना नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांच्या नावावर दीड लाखांची खंडणी घेण्याचा प्रकार शहरातील अंधेरी पूर्व परिसरात घडला आहे.

नितीन नांदगावकर यांच्या नावावर खंडणी, घराचा ताबा मिळवूण देण्याच्या नावाखाली दीड लाखांना गंडा
| Updated on: Dec 01, 2020 | 3:49 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांच्या नावावर दीड लाखांची खंडणी घेण्याचा प्रकार शहरातील अंधेरी पूर्व परिसरात घडला आहे. बिल्डरकडून घर मिळवून देतो असे सांगत ही खंडणी घेतल्याचा आरोप तक्रारदार संदीप यांनी केला आहे. याबाबत अंधेर पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरज निकम (24) आणि रोहित कांबळे (19) या आरोपींना अटक केली आहे. (ransom of 1.5 lakh in the name of Nitin Nandgaonkar in Mumbai)

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा या ठिकाणी विकी सिद्दिकी नावाचा बिल्डर आहे. या बिल्डरकडून घर घेण्यासाठी तक्रारदार संदीप यांनी बिल्डरला 18 लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे घेतल्यानंतर बिल्डर सिद्दिकी यांनी संदीप यांना घर दिले नाही.

नांदगावकर यांच्या फेसबूक फॅन क्लब ग्रुपवरुन नंबरची देवाणघेवाण

बिल्डर सिद्दिकी घर देत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारदार संदीप यांनी नितीन नांदगावकर यांच्या नावाच्या फेसबूकवरील नितीन नांदगावकर फॅन क्लब या ग्रुपवर मदत मागितली. त्यानंतर या ग्रुपमधून आरोपी सुरज आणि रोहित यांनी नितीन नांदगावकर यांच्या ऑफिसमधून बोलत आहोत असे सांगितले. त्यांनी मदतीच्या बदल्यात संदीप यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपींच्या मागणीप्रमाणे संदीप यांनी या दोघांनाही दीड लाख रुपये दिले. मात्र,पैसा मिळताच त्यांनी आपला मोबाईल नंबर बंद केला.

फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसांत धाव

दरम्यान, तक्रारदार संदीप यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसांत धाव घेतली. त्यांनी अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनी सर्व तांत्रिक तपास पूर्ण करुन सुरज निकम (24) या आरोपीला सातारा तर आरोपी रोहित कांबळे (19) याला मुंबईतून आटक केली. दरम्यान दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (ransom of 1.5 lakh in the name of Nitin Nandgaonkar in Mumbai)

संबंधित बातम्या :

“अस्मिता महत्वाची की लाचारी ते ठरवा” नितीन नांदगावकरांना संदीप देशपांडेंचा टोला

माटुंगा स्टेशनवर तरुणींची छेड काढणाऱ्या विकृतास नितीन नांदगावकरांकडून चोप

दररोज रिक्षा फोडणार, नितीन नांदगावकरांकडून रिक्षाचालकांना ‘खळ्ळखट्याक’चा इशारा

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.