क्रीडामंत्र्यांच्या पत्नीची अडीच लाखाची रोकड असलेली बॅग चोरीला

चंदीगडमध्ये क्रीडामंत्र्यांच्या पत्नीची रोकड आणि दागिने असलेली बॅग चोरांनी लंपास केली आहे. या बॅगमध्ये अडीच लाखांची रोकड आणि एक नेकलेस होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून क्रीडामंत्र्यांच्या पत्नीच्या ड्रायव्हरचीही चौकशी सुरु आहे.

क्रीडामंत्र्यांच्या पत्नीची अडीच लाखाची रोकड असलेली बॅग चोरीला

चंदीगड : हिमाचल प्रदेशचे क्रीडामंत्री गोविंद सिंग ठाकूर (Himachal Minister Govind Singh Thakur) यांच्या पत्नी रजनी ठाकूर यांची अडीच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरीला गेली आहे (Sports Ministers wife bag theft). या बॅगमध्ये अडीच लाखांच्या रोकडसोबतच दागिनेही होते, त्यावरही चोरांनी डल्ला मारला आहे. चंदीगडच्या, सेक्टर-8 मार्केटमध्ये ही घटना घडली. रजनी ठाकूर यांच्या गाडीतून ही बॅग चोरी गेली आहे. घटनेवेळी रजनी ठाकूर यांचा ड्रायव्हर गाडीतच बसला होता (Sports Ministers wife bag theft). याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

चंदीगडच्या सेक्टर-3 ठाण्यातील पोलिसांना सेक्टर-8 मध्ये चोरी झाल्याची माहिती मिळाली. सेक्टर-8 च्या हेडमास्टर सलूनजवळच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून पैसे आणि दागिन्यांनी भरलेली ही बॅग चोरी झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना चोरी झालेली बॅग ही मनालीच्या सिमसा गावात राहाणारे हिमाचल प्रदेशचे क्रीडामंत्री गोविंद सिंग ठाकूर यांच्या पत्नीची असल्याचं कळलं. रजनी ठाकूर त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त चंदीगड येथे आल्या होत्या आणि त्या सेक्टर 27 च्या हिमाचल भवनात थांबल्या होत्या.

रजनी ठाकूर या सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारच्यासुमारास सेक्टर-8 येथील हेडमास्टर सलून येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्या तब्बल चार तासांनी हिमाचल भवन पोहोचल्या. मात्र, परत आल्यावर जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांची बॅग गाडीत नव्हती. त्यांच्या बॅगमध्ये अडीच लाख रुपयांची रोकड, काही कागदपत्र आणि एक नेकलेस होता.

ड्रायव्हर गाडीत बसून होता, तेव्हा त्याला बोनटजवळ 10-10 रुपयांच्या नोटा पडल्या असल्याचं दोन तरुणांनी सांगितलं. त्याने गाडीतून उतरुन नोटा उचलल्या आणि पलटून पाहिलं तर गाडीतून बॅग घेऊन ते दोन तरुण तोपर्यंत गायब झाले होते, असं पोलिसांच्या तपासात रजनी ठाकूर यांच्या ड्रायव्हरने सांगितलं.

पोलिसांना याप्रकरणी तपास सुरु केला आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत आहेत. नोट पडणे किंवा गाडीतून तेल पडत असल्याचं सांगत बॅग चोरीच्या अनेक घटना सध्या चंदीगडच्या वेगवेगळ्या परिसरात घडत आहेत. मात्र, पोलीस अद्यापही या चोरट्यांना पकडण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *