पुण्यात बिल्डरच्या मुलावर टिपू पठाणचा गोळीबार

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. बांधकाम व्यावसायिक बिनावत बिल्डर यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू पठाण असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. बिनावत बिल्डर हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू …

पुण्यात बिल्डरच्या मुलावर टिपू पठाणचा गोळीबार

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. बांधकाम व्यावसायिक बिनावत बिल्डर यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू पठाण असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

बिनावत बिल्डर हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू पठाण असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. पुण्यात वानवडीत परिसरात महंमद वाडी येथे मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. 10 ते 15 जणांच्या टोळक्यामधील एकाने कारमधून निघालेल्या निलेश बिनावत यांच्यावर गोळीबार केला. आरोपीने निलेश बिनावतवर 3 गोळ्या झाडल्या.

बिल्डर निलेश बिनावत हे या गोळीबारात जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आर्थिक व्यवहारातून बिल्डर निलेश बिनावतवर गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन गटातील वादातूनही गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोळीबाराचं नेमकं कारण काय, हे अद्याप नीट कळू शकलं नाही. पुण्यातील वानवडी पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *