10th SSC Result : विद्यार्थ्यांच्या मार्कशीट, सर्टिफिकेट बाबतीत महत्वाची बातमी, समुपदेशनासाठी हे हेल्पलाईन नंबर

10th SSC Result : ऑनलाइन दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार होता. पण वेळ बदलण्यात आली आहे. निकाल 11.30 वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या वेबसाइटवर हा निकाल पाहू शकता.

10th SSC Result : विद्यार्थ्यांच्या मार्कशीट, सर्टिफिकेट बाबतीत महत्वाची बातमी, समुपदेशनासाठी हे हेल्पलाईन नंबर
SSC Result (File Photo)
Image Credit source: PTI
| Updated on: May 08, 2026 | 12:24 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या शालांत परिक्षांचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेसाठी यंदा 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणा केली होती. त्यापैकी 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांचं पास होण्याचं प्रमाण 92.09 टक्के आहे. दहावी हा कुठल्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. दहावीत मिळणाऱ्या गुणांवर करिअरची पुढची दिशा ठरते. त्यामुळे दहावीच्या निकालाचं एक वेगळं महत्व आजही टिकून आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत इयत्ता 10 वीची परीक्षा झाली. ऑनलाइन दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार होता. पण वेळ बदलण्यात आली आहे. निकाल 11.30 वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या वेबसाइटवर हा निकाल पाहू शकता.

दरम्यान फेल झाल्यामुळे, मार्क कमी मिळाल्यामुळे खचून जाणारे विद्यार्थी-पालक यांच्यासाठी बोर्डाने हेल्पलाइनची व्यवस्था केली आहे. पालक आणि विद्यार्थी या हेल्पलाइनची मदत घेऊ शकतात.

टेलिमानस हेल्पलाईन १४४१६

मनोदर्शन हेल्पलाईन ८४४८४४०६३२

या नंबरवर समुपदेशनासाठी पालक विद्यार्थ्यांसाठी सेवा उलब्ध आहे.

एससीईआरटी मार्फत 315 समुपदेशक नेमण्यात आले आहेत. फोन नंबर, मेल आयडी, व्हॉट्सअप नंबर बोर्डाच्या साईटवर टाकले आहेत.

गेल्या परीक्षपर्यंत मार्कशीट आणि सर्टिफिकेट वेगवेगळे छापत होतो. आता एकाच पेपरवर दोन्ही देणार आहोत. निकाल लागल्यापासून 15 व्या दिवशी शाळेत मिळणार आहे.

सात वेबसाईट आहे. टीव्ही९ मराठीसह सात वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. बोर्डाची वेबसाईट आहे. डीजीलॉकर, नवनीत, एमकेसीएलची वेबसाईट आहे.

 

Follow Us