बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा उघड, राज्य शिक्षण..

देशभरात नीट परीक्षाचा विषय चर्चेत आहे. हेच नाही तर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. आता नीट परीक्षेचा विषय असतानाच टंकलेखन परीक्षेतील मोठा घोटाळा उघडकीस आलाय.

बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा उघड, राज्य शिक्षण..
exam
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 4:41 PM

राज्यात 10 जून ते 14 जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत. काल परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रावर 14 विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र, पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी एक्सेस घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितले.

त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त 14च विद्यार्थी परीक्षा देत होते. इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत असे विचारले असता केंद्रप्रमुख उत्तर देऊ शकले नाहीत. प्रत्यक्षात 22 ही विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे एक्सेसवरून स्पष्ट दिसत होते. इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते.

या परीक्षेचा युजर आयडी व पासवर्ड हा फक्त केंद्र प्रमुख यांच्याकडेच असतो. हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले?  बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला. बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी यांना देखील याबाबतची माहिती देण्यात आली.

जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलाय. आयटी शिक्षक गजानन लाघे सह इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 409, 120 ब, 420, आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हेच नाही तर या परीक्षा घोटाळ्यात आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याचे देखील सांगितले जातंय.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.