AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GATE Exam 2022 : गेट परीक्षा नोंदणीसाठी शेवटची संधी, रजिस्ट्रेशन कसं करायचं?

गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल.  विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात.

GATE Exam 2022 : गेट परीक्षा नोंदणीसाठी शेवटची संधी, रजिस्ट्रेशन कसं करायचं?
GATE 2022
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 30, 2021 | 12:57 PM
Share

GATE Exam 2022 नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तर गेट परीक्षा 2022 मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील माहितीसाठी गेटच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021 अर्जामध्ये सुधारणा – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022 GATE परीक्षेच्या प्रस्तावित तारखा – 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 निकाल जाहीर होण्याची तात्पुरती तारीख – 17 मार्च 2022

नोंदणी कशी करावी?

गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल.  विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात. परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील. मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.

नोंदणी शुल्क

एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क : 750 रुपये लेट फीसह: 1250 रुपये इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी : 1500 रुपये विलंब फीसह 2000 रुपये

परीक्षा कधी होणार?

GATE 2022 परीक्षा 05 फेब्रुवारी, 06 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.आयआयटी खरगपूरने कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.

गेट परीक्षा नेमकी काय?

आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. 2021 च्या गेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआटी मुंबईकडं देण्यात आली होती.

इतर बातम्या:

MHT CET: पुरामुळं विद्यार्थी सीईटीला मुकले, पण काळजी नको; पुन्हा परीक्षा घेणार, उदय सामंतांची तत्परता

NEET 2021 : नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल

GATE 2022 online application last date today check details at gate.iitkgp.ac.in

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ