5

MHT CET: पुरामुळं विद्यार्थी सीईटीला मुकले, पण काळजी नको; पुन्हा परीक्षा घेणार, उदय सामंतांची तत्परता

राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा सुरु आहेत. औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यामुळे 215 विद्यार्थी एव्हरेस्ट मधील CET परीक्षेला मुकले असल्याचं समोर आलं होतं. पुलावरून पाणी वाहत असल्याने औरंगबाद शहरासह परराज्यातील विद्यार्थी मुकले परीक्षेला होते.

MHT CET: पुरामुळं विद्यार्थी सीईटीला मुकले, पण काळजी नको;  पुन्हा परीक्षा घेणार, उदय सामंतांची तत्परता
परीक्षेला मुकलेले विद्यार्थी
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 11:08 AM

औरंगाबाद : महाराष्ट्रात सध्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मराठवाड्याला गुलाब चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय तर 13 जणांच्या मृत्यू झाली आहे. राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा सुरु आहेत. औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यामुळे 215 विद्यार्थी एव्हरेस्ट मधील CET परीक्षेला मुकले असल्याचं समोर आलं होतं. पुलावरून पाणी वाहत असल्याने औरंगबाद शहरासह परराज्यातील विद्यार्थी मुकले परीक्षेला होते. रस्ता नसल्याने बराच वेळ विद्यार्थी रस्ता सुरळीत होण्याची वाट पाहत होते. मुसळधार पावसामुळे पोहचू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तातडीनं दखल घेत एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. पावसामुळं वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील, असं उदय सामंत यांनी जाहीर केल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. टीव्ही 9 मराठीनं यांसदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

नांदेडमध्येही विद्यार्थी परीक्षेला मुकले

पावसामुळे  नांदेड मध्ये काही विद्यार्थ्यांना एमएच सीईटी ची परीक्षा देता आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल येथे एमएचटी  सीईटी चे परीक्षा सेंटर होते. काल दिवसभरात दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती.बी. फार्मसी आणि डी. फार्मसीसाठी ही पूर्व परिक्षा होती .  मात्र, काल  पावसामुळे  सकाळी 9 ते 12 या वेळेची परीक्षा होऊ शकली नाही. परीक्षा केंद्रावर  जाण्याऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये पोहोचता आलेले नाही. परीक्षा देण्यासाठी अनेक ठिकाणाहुन  दूरवरून विद्यार्थी  आले होते.  सकाळी साडे सात वाजल्यापासून परीक्षा सेंटरच्या अलीकडेच येऊन विद्यार्थी अडकले होते. रस्त्यात  मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनांची व्यवस्था झाली नाही. त्यामुळ काही विद्यार्थ्यांना  सेंटर पर्यंत पोहोचता आलेच नाही. दरम्यान, परीक्षा व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांद्याची हजेरी घेऊन त्यांचे मोबाईल क्रमांक घेतले.  नंतर या विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे
  1. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी झाल्या आहेत.
  2. मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी झाल्या आहेत.
  3. बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021या दरम्यान होत आहेत.
  4. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष),बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी होत आहेत.
  5. बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि.4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021, बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021रोजी होणार आहेत.
  6. बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.

20 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार

या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

इतर बातम्या :

MHT CET Exam Schedule : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

MHT CET Exam Date : एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा

MHT CET exam Aurangabad student fail to attend exam due to flood Uday Samant said exam conduct again

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले