AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHT CET Exam Date : एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखांसदर्भात माहिती दिली आहे.

MHT CET Exam Date : एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, 'या' दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 4:26 PM
Share

मुंबई: महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखांसदर्भात माहिती दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी एमएचटी परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कोरोना नियमांचं पालन करुन आयोजित करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

15 सप्टेंबरपासून परीक्षा सुरु

व्यावसायिक अभ्यासक्रमांची एमएचटी सीईटी परीक्षा15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर कालावधीत होणार आहे 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील, असंही ते म्हणाले. याशिवाय यंदा सीईटी परीक्षा देणाऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 10 हजारांनी वाढ झाली आहे. सीईटी परीक्षा झाल्यावर 1 नोव्हेंबर पासून कॉलेज सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याच उदय सामंत यांनी सांगितलं.

सीईटीचं तिकीट दाखवून लोकल प्रवेश

ज्या दिवशी मुंबई अथवा अन्य ठिकाणी परीक्षा असतील त्यादिवशी विद्यार्थ्यांनी सीईटीचं प्रवेशपत्र दाखवल्यास त्यांना लोकलमध्ये प्रवेश दिला जाईल, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

कोरोना नियमांचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा

कोरोना नियम पाळून चाकरमानी गणेशोत्सव साजरा करतील, अशी अपेक्षा असल्याचं उदय सामंत म्हणाले. आरटीपीसीआरसाठी कुणालाही कोकणात जाण्यापासून थांबविले जाणार नाही चिपी विमानतळावरुन उड्डाण सुरू झाले पाहिजे या मताचा मी आहे, असं उदय सामंत म्हणाले. मला असं वाटतं केंद्र सरकारने श्रेय वादाने उदघाटन अडवू नये, असही ते म्हणाले.

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने आयोजित केलेल्या विविध सीईटीमध्ये जवळपास 10 लाख उमेदवार उपस्थित राहणे अपेक्षित आहे. अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक लवकरच ऑनलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, कृषी, कायदा, एमबीए, आर्किटेक्चर इत्यादी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या तारखांच्या ताज्या अपडेटसाठी cetcell.mahacet.org ला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

MHT CET 2021 परीक्षा पॅटर्न

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट परीक्षेच्या पॅटर्नसह अधिकृत परीक्षा पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेलने पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटांसाठी एमएचटी सीईटी 2021 चा परीक्षेचा पॅटर्न जाहीर केला आहे.

याशिवाय परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग सिस्टम लागू होणार नाही. परीक्षार्थींनी नोंद घ्यावी की सीईटीची गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पॅटर्न जेईई मेनच्यासारखा असेल. तसंच, जीवशास्त्र विषय असताना परीक्षेचा पॅटर्न नीटसारखा असेल. यासह एमएचटी सीईटी 2021 च्या पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रामुख्याने अॅप्लिकेशन बेस्ड असतील.

इतर बातम्या:

MHT CET 2021: एमएचटी-सीईटीचं व्हायरल वेळापत्रक खोटं, सीईटी परीक्षा सेलकडून स्पष्टीकरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर

Uday Samant declare commencement exam dates of MHT CET

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.