AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात केस धुतल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्कॅल्प तेलकट होतेय तर ‘या’ हेअर मास्कचा करा वापर

उन्हाळ्यात स्कॅल्पमधील सेबमचे अतिरिक्त उत्पादन आणि घामामुळे केस लवकर अस्वच्छ किंवा तेलकट होतात. तर केस जास्त तेलकट दिसू नयेत यासाठी काही नैसर्गिक घटकांपासून हेअर मास्क बनवून तो केसांना लावू ही समस्या दुर करू शकतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात केस धुतल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्कॅल्प तेलकट होतेय तर 'या' हेअर मास्कचा करा वापर
hair mask
| Edited By: | Updated on: Mar 18, 2026 | 1:48 PM
Share

उन्हाळ्यात स्कॅल्पला खूप घाम येत असतो ज्यामुळे केस धुतल्यानंतरही तेलकट दिसतात. तसेच ज्यांची स्कॅल्प नैसर्गिकरित्या तेलकट असते, त्यांच्यासाठी ही समस्या अधिकच वाढते. कारण उन्हाळ्यात तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे स्कॅल्पवरील सेबम म्हणजेच नैसर्गिक तेलाचे उत्पादन वाढते. घाम आणि धुळीमुळे देखील स्कॅल्प आणि केसांवर घाण जमा होते. कधीकधी शॅम्पू लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस तेलकट दिसतात. अशा वेळेस तुम्ही नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हेअर मास्क लावू शकता, जे केसांमधील तेलकटपणा कमी करण्यास मदत करतात आणि तुमचे केस कोरडे होऊ देत नाहीत.

उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत. आजच्या लेखात आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर मास्कबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमचे केस ऑईल फ्री ठेवतील.

मुलतानी माती हेअर मास्क

तुमची स्कॅल्प जर तेलकट असेल आणि उन्हाळ्यात ही समस्या वाढत असेल तर तुम्ही मुलतानी मातीचा हेअर मास्क लावावा. तर हा हेअर मास्क बनवण्यासाठी मुलतानी मातीची पावडर घ्या किंवा ती 1 तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यात कोरफड आणि 4 चमचे गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट बनवा. हा मास्क तुमच्या स्कॅल्पला लावा. 10 मिनिटांनंतर केस धुवा. तुम्ही हा हेअर मास्क संपूर्ण केसांनाही लावू शकता, पण ते कोरडे होणार नाही याची काळजी घ्या.

अंड्याचा हेअर मास्क

उन्हाळ्यात तेलकट स्कॅल्पला फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही अंड्याचा हेअर मास्क लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग वेगळा करा आणि तो लिंबाच्या रसात मिक्स करा. अंड्यामुळे तुमच्या केसांना प्रथिने मिळतील ज्यामुळे ते चमकदार आणि मऊ होतील. तर लिंबामुळे स्कॅल्पवरील तेल आणि कोंडा कमी होण्यास मदत होईल. हे मिश्रण स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत लावा आणि 15-30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर सामान्य तापमानाच्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.

दह्याचा हेअर मास्क बनवा

उन्हाळ्यात तुम्ही दही आणि जास्वंदीच्या फुलांपासून केसांचा मास्क बनवू शकता. यासाठी तुम्ही दह्यात जास्वंदीच्या फुलांची पावडर किंवा ताज्या फुलांची पेस्ट वापरू शकता. हे दोन्ही घटक एकत्र मिसळा आणि स्कॅल्पवर व संपूर्ण केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांना केवळ अद्भुत मुलायमपणाच मिळणार नाही, तर तुमच्या केसांच्या रंगाचा पोतही अधिक खुलून दिसेल. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड स्कॅल्पवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते. जास्वंदीच्या पाकळ्या केसांचे पोषण करतात.

या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

तुमची स्कॅल्प जर खूप तेलकट असेल तर तुम्ही हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावू शकता. किंवा तुमची स्कॅल्प कमी तेलकट असेल, तर तुम्ही तो दर 10 दिवसांनी एकदा लावू शकता. हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्कॅल्पवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हे हेअर मास्क केसांना जास्त कोरडे करणारे नसावेत. 15 ते 20 मिनिटे पुरेशी आहेत. जड स्टाइलिंग उत्पादनांमुळे देखील केस लवकर तेलकट होऊ शकतात. हे टाळावे. नेहमी सौम्य शाम्पू वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण?
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत
2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी
Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल, थेट संसदेत...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना... संजय राऊतांचा मोदींवर थेट प्रहार
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! नेमका मसला काय?
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत...नेमका मसला काय?
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर