सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर

ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल व त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमी सातत्यानं रोजगारभिमूख आणि कौशल्य विकासाचं अभ्यासक्रम सुरु करत असतं. विद्यापीठानं नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञानातील महत्वाची क्रांती मानले जाणारे ड्रोन तंत्रज्ञान आता विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच याबाबतचे पदवी तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. यासाठी विद्यापीठाने फोरफोर्सेस ऐरो प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या करारानुसार विद्यापीठात दोन प्रमाणपत्र तसेच पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रिया कशी होणार?

ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल व त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

ड्रोन तंत्रज्ञानाचे नव्याने सुरु झालेले अभ्यासक्रम

प्रमाणपत्र अभ्यासक्रम

इंट्रोडक्शन टू ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी – 2 आठवडे )
अड्वान्स कोर्स ऑन ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी 12 आठवडे )
ड्रोन पायलट ट्रेनिंग कोर्स (एक ते दोन आठवडे)

पदवी अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी तीन वर्षे)

पदव्युत्तर पदवी

मास्टर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी दोन वर्षे)

अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फोरफोर्सेस कंपनीकडून या विषयातील तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल.  विद्यार्थ्यांना थेअरी अभ्यासक्रमाबरोबर प्रात्यक्षिकही करण्याची संधी मिळणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. तर, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना टाटा ऍडव्हान्स सिस्टिम लिमिटेड, भारत फोर्ज, महिंद्रा डिफेन्स सिस्टिम लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती कुठे मिळणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रमांबाबत वेबसाईटवर प्रवेश परीक्षेसंदर्भात अधिक माहिती उलब्ध होईल. इच्छूक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती मिळवावी.

इतर बातम्या:

अकरावीच्या सीईटीचा नवा पेच, नोंदणी संपल्यानंतर सीबीएसईचा निकाल, विद्यार्थ्यांची मुदतवाढ देण्याची मागणी

जळगावात फी न भरल्याने शाळेनं विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं, जि.प. सभापतींकडून कारवाईचा इशारा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI