अकरावीच्या सीईटीचा नवा पेच, नोंदणी संपल्यानंतर सीबीएसईचा निकाल, विद्यार्थ्यांची मुदतवाढ देण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

अकरावीच्या सीईटीचा नवा पेच, नोंदणी संपल्यानंतर सीबीएसईचा निकाल, विद्यार्थ्यांची मुदतवाढ देण्याची मागणी
प्रातिनिधिक फोटो

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मंडळाच्यावतीनं पोर्टल तयार करण्यात आलं होतं. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 ऑगस्टला संपली आणि सीबीएसईचा दहावीचा निकाल 3 ऑगस्टला जाहीर झाल्यानं सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

सीईटीला मुकण्याची भीती

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उशिराने लागल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी CET ला मुकण्याची भीती निर्माण झाली आहे. CET अर्ज नोंदणीची तारीख 2 ऑगस्ट आणि दहावीचा निकाल जाहीर झाला 3 ऑगस्टला लागल्यानं अकरावी सीईटी परीक्षेचा अर्ज दाखल करता येणार नाही. निकालाच्या संभ्रमात बऱ्याच विद्यार्थ्यांची राहिली अर्ज नोंदणी प्रक्रिया राहिली आहे.

मुदत वाढवून देण्याची मागणी

सीईटीला अर्ज करण्याची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. मूल्यांकनाच्या आधारावरून निकाल लावण्यास झालेल्या उशिरामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार आहे..नोंदणीची मुदत समाप्त झाल्यानं सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश कसे मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सीईटी संदर्भात पुढील सुनावणी 10 ऑगस्टला

मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेश बाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

इतर बातम्या:

‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांनी चंद्रकांतदादांच्या दुसऱ्या नसेवर बोट ठेवलंच!

राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण, राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra fyjc admission cet new problem raised due to late declaration of class 10 by cbse students demanded extension for registration

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI