AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर समुद्रात रात्री मोठा खेळ, भारताकडून चीनला जबर धक्का, तेलानं भरलेलं जहाज…

Crude Oil : युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. अशातच आता दक्षिण चीन समुद्रात मोठी घडामोड पहायला मिळाली. यामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे, तर चीनला मोठा धक्का मानला जात आहे.

भर समुद्रात रात्री मोठा खेळ, भारताकडून चीनला जबर धक्का, तेलानं भरलेलं जहाज...
Oil TankerImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 18, 2026 | 5:16 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. अशातच आता दक्षिण चीन समुद्रात मोठी घडामोड पहायला मिळाली. रशियातून लाखो बॅरल कच्चे तेल घेऊन चीनकडे जाणारी अनेक टँकर जहाजे आता अचानक मार्ग बदलून भारतातील बंदरांकडे वळली आहेत. यामुळे चीनला मोठा दणका बसला आहे. याबाबात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समुद्रातच जहाजांचा मार्ग बदलला

शिप-ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार, अॅक्वा टायटन नावाचे एक विशाल जहाज जानेवारीच्या शेवटी बाल्टिक समुद्रातील बंदरातून रशियन कच्चे तेल घेऊन निघाले होते. हे जहाज चीनमधील रिझाओ बंदरात जाणार होते. पण मार्चच्या मध्यात, दक्षिण-पूर्व आशियाई समुद्रात पोहोचल्यानंतर या जहाजाने अचानक यू-टर्न घेतला. आता हे जहाज 21 मार्च रोजी भारतातील न्यू मंगळूर बंदरात पोहोचणार आहे.

वोर्टेक्स लिमिटेडच्या आकडेवारीनुसार रशियन तेल घेऊन जाणाऱ्या किमान सात टँकरांनी समुद्राच्या मधोमध चीनऐवजी भारताकडे प्रवासाला सुरुवात केली आहे. तसेच आणखी एक स्वेझमॅक्स टँकर, जे कझाकिस्तानचे CPC ब्लेंड क्रूड घेऊन रशियातील नोवोरोसिस्क येथून निघाले होते, तेही चीनमधील रिझाओकडे जात होते, मात्र या जहाजानेही आपला मार्ग बदलला आहे. आता ते 25 मार्च रोजी गुजरातमधील सिक्का बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.

जहाजांनी अचानक मार्ग का बदलला?

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्धामुळे मध्यपूर्वेतून भारताला मिळणाऱ्या तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताला तात्पुरत्या स्वरूपात रशियाकडून तेल खरेदी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर भारतीय रिफायनऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत केवळ एका आठवड्यात रशियाकडून सुमारे 30 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले. त्यामुळे या जहाजांनी भारताकडे प्रवासाला सुरुवात केली आहे.

चीनला बसला मोठा धक्का

गेल्या काही महिन्यांत भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली होती, त्यामुळे चीन हा रशियाचा सर्वात मोठा ग्राहक बनला होता. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ही जहाजे भारताकडे वळल्यामुळे चीनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे आता भारतासोबतच जपान आणि दक्षिण कोरिया यांनाही पुन्हा रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात चीनकडे जाणाऱ्या रशियन तेलाच्या पुरवठ्यात आणखी घट होऊ शकते. हा चीनला मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...