AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

War Chest : आता गॅसची टंचाई झटक्यात संपणार, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय, शेतकऱ्यांचीही चिंता मिटली!

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. भारतालाही त्याची झळ बसत आहे. भविष्यात अशी अडचण होऊ नये यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

War Chest : आता गॅसची टंचाई झटक्यात संपणार, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय, शेतकऱ्यांचीही चिंता मिटली!
gas supplyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 18, 2026 | 4:20 PM
Share

Iran Israel War : सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात उर्जासंक निर्माण झाले आहे. भारतात एलपीजी, एलएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे युद्ध आणखी काही दिवस चालूच राहिल्यास भविष्यात भारतात गॅसची किंमत वाढू शकते. दरम्यान, आता अशी स्थिती वारंवार निर्माण होऊ नये, भविष्यात असा प्रसंग आलाच तर भारताची पूर्ण तयारी असावी, म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता भविष्यात खतनिर्मितीचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे सांगितले जात आहे.

सरकारने नेमेका काय निर्णय घेतला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार सरकारने एलएनजीचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून 600 कोटी रुपयांची वॉर चेस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे पैसे वापरले जाणार आहेत. देशात खातनिर्मिती करणाऱ्या कारकान्यांना गॅसची कमतरता भासू नये तसेच खतनिर्मितीची प्रक्रिया निरंतर चालूच राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीतील पिकांसाठी खताची खूप गरज असते. या खताच्या मदतीनेच शेतीतील उत्पादन वाढते. परंतु खताची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी गॅसची मोठ्या प्रमाणात गरज भासते. गॅस कमी पडला तर त्याचा परिणाम खतनिर्मितीवर होतो. परिणामी शेतात कमी उत्पादन होण्याचा धोका असतो. तसेच शेतकऱ्यांनाही मोठा तोटा होऊ शकतो. सध्याचे सुरु असलेले युद्ध लक्षात घेता भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठीच सरकारने हा 600 कोटी निधी काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना काय फायदा?

सध्या भारतात युरिया या खताची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना गॅसची खूप गरज भासते. ही गरज दीर्घकालीन करारांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. गॅसची कमतरता भासलीच तर उर्वरित गॅस स्पॉट मार्केटमधून खरेदी केला जातो. गॅसचा पुरवठा घटला की खतनिर्मिती कमी होते. त्यामुळेच गॅसचा पुरवठा घटल्यास सरकार थेट स्पॉट मार्केटमधूनही हा गॅस खरेदी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे आता भविष्यात युरिया निर्मितीला अडचण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!