AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम वांगचुक यांचा मध्यरात्रीच्या बैठकीवर धक्कादायक खुलासा, थेट राजकीय नेत्यांवरील..

सोनम वांगचुक यांनी केलेल्या 26 दिवसांच्या उपोषणाने एक मोठी ताकद अभिजीत दिपकेंच्या उपोषणाला मिळाली. 26 व्या दिवशी त्यांनी हे उपोषण सोडले. आता सोनम वांगचुक यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला.

सोनम वांगचुक यांचा मध्यरात्रीच्या बैठकीवर धक्कादायक खुलासा, थेट राजकीय नेत्यांवरील..
Sonam Wangchuk
| Updated on: Aug 06, 2026 | 7:45 AM
Share

सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. 26 दिवस नीट पेपरफुटीविरोधात ते उपोषणाला बसले होते. सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याने सरकारने त्यांना जंतर मंतरहून रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले. 26 दिवस केलेल्या उपोषणामुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले. 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडण्यात सरकारला यश आले. मात्र, यादरम्यानच सोनम वांगचुक यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. मध्यरात्री काय घडले होते हे त्यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. सोनम वांगचुक यांनी म्हटले की, 26 दिवसाचे उपोषण संपवतानाचा फोटो शेअर न करण्याचे वचन सरकारने दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. त्यांनी दिलेले वचन पाळले नाही. यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मला खरोखरच खूप जास्त निराश केले.

सोनम वांगचुक यांनी दावा केला की, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्री झालेल्या बैठकीचे कोणतेही फोटो व्हायरल केले जाणार नाहीत, जोपर्यंत विद्यार्थी आणि काही विरोधी नेते यात सहभागी होत नाहीत तोपर्यंत. मंत्र्यांनी फोटोग्राफर बोलावले होते. त्यांनी मला वचन दिले होते की, फोटो कुठेही शेअर करणार नाहीत. त्यांनी दिलेली वचन तोडले.

फक्त सत्ताधारींच्या कार्यक्रमाप्रमाणे हे सर्व दाखवण्यात आले. मी त्यांना म्हटले होते की, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आणि विरोधी पक्षातील नेते यादरम्यान पाहिजे आहेत. हा एक संयुक्त कार्यक्रम व्हावा ,ही माझी इच्छा होती. त्यांनी मला हे फोटो कुठेही व्हायरल होणार नसल्याचे म्हटल्यानंतरही त्यांनी ते केले. काही वेळातच फोटो शेअर झाली.

मला माहिती नाही की, कसे पण टीव्ही चॅनलवर माझे उपोषण सोडल्याचे फोटो दाखवण्यात आले. हा मोठा आरोप सोनम वांगचुक यांनी सरकारवर लावला. सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले की, माझा आता नेत्यांवर विश्वास राहिला नाही. उपोषण सोडतानाच त्यांनी स्पष्ट केले होते की, हे फोटो व्हायरल होणार नाहीत. पण तसे घडले नाही. सोनम वांगचुक यांनी हा सरकारवर मोठा आणि गंभीर आरोप केला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल